कुंकळ्ळी कूपनलिका सील करण्याचे काम सुरू

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

कारखान्यातील सांडपाणी सोडण्यासाठी खोदलेल्या बेकायदेशीर कूपनलिका सील करण्यास आजपासून(मंगळवार) सुरवात झाली आहे. 

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत युनायटेड मरायन्स व क्वॉलिटी फूड्स या कारखान्याच्या आवारात मासळी प्रक्रिया कारखान्यातील सांडपाणी सोडण्यासाठी खोदलेल्या बेकायदेशीर कूपनलिका सील करण्यास आजपासून(मंगळवार) सुरवात झाली आहे. 

कारवाई करताना सासष्टीचे संयुक्त मामलेदार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना कारवाईची माहिती देण्यास नकार दिला. अधिकारऱ्यांनी पत्रकारांना कारखान्याच्या आत येण्यास परवानगी दिली नाही. बुधवारी ही कूपनलिका सील करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. 

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत धाड घालून सांडपाणी कूपनलिकेद्वारे जमिनीत सोडण्यात येत असलेल्या सुमारे बत्तीस बेकायदेशीर कूपनलिका शोधून काढल्या होत्या. क्वॉलिटी फूड्स, युनायटेड मरायन्स, इंडोटेक व सागर फिड्स या चार मासळी प्रक्रिया प्रकल्पात हे बेकायदेशीर उद्योग चालत असल्याचे उघड झाले होते.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या