काणकोणातील बंधाऱ्यांचे काम डिसेंबर अखेरपर्यंत होणार पूर्ण

Work of Canacona dam will be completed by the end of December
Work of Canacona dam will be completed by the end of December

काणकोण: काणकोणातील नद्यांवरील बंधाऱ्यांत पाणी अडवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ती पूर्ण करण्यात येणार आहे, असे जलस्रोत खात्याचे स्थानिक साहाय्यक अभियंते आजाद वेर्णेकर यांनी सांगितले. 

काणकोणातील बंधाऱ्यांत पाणी अडवण्याचे काम जलस्रोत खात्याच्या स्थानिक व केपे येथील जलस्रोत कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याचे जलस्रोत खात्याच्या स्थानिक कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी माहिती देताना सांगितले. काणकोणात दोन्ही कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात ४२ बंधारे आहेत. त्यापैकी गालजीबाग नदीवर भटाबांध  व माशे येथे खारे पाणी नदीच्या वरच्या पात्रात जाऊ नये यासाठी बंधारे बंद करण्यात येतात. सर्वाधिक बंधारे गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रात तळपण नदी व तिच्या उपनद्यांवर आहेत. त्यामध्ये कुस्के, तामनामळ, अष्टगाळ, दाबेल, कुंभेगाळ, पर्तगाळ अर्धफोंड त्याचप्रमाणे फुलांमळ, पान्न, तसेच गालजीबाग नदीवर गाळये, बोरुस, भटाबांध असे बंधारे आहेत.


काणकोणमधील पहिला जलपुरवठा प्रकल्प तळपण नदीतील अर्धफोंड येथील डोहात उभारण्यात आला होता. त्या डोहात पाणी साठवण्यासाठी तळपण नदीवर अर्धफोंड येथे बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येते. या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे भूगर्भ पातळी वाढण्याबरोबरच पाण्याचा उपयोग वायंगण शेती व भाजी पिकासाठी करण्यात येतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येत होते. मात्र, यंदा जलस्रोत खात्याने बंधाऱ्यात  पाणी अडवण्यास दिरंगाई केली आहे. 


महालवाडा व तामने येथीलरहिवाशांसाठी भटाबांध महत्त्वाचा
गालजीबाग नदीवरील भटाबांध हा भरतीच्या वेळी खारे पाणी शेतीत, बागायतीत व विहिरीत भरण्यापासून महालवाडा व लोलये पंचायतीच्या तामने भागातील रहिवाशांना मुक्ती देत असतो. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या भरतीपूर्वी या बांधात पाणी अडवण्यात येत होते. यंदा कार्तिकी पौर्णिमेला आलेल्या भरतीने खारे पाणी शेतजमिनीत व बागायतीत घुसले आहे, असे येथील एक जमीनदार विजयकुमार प्रभुगावकर यांनी सांगितले. पूर्वी या २२ मीटर लांबीच्या बंधाऱ्याला फळी घालण्यासाठी फक्त पाच हजार रुपये जलस्रोत खात्याकडून देण्यात येत होते. गेल्या वर्षी पंधरा हजार रुपये जलस्रोत खात्याकडून देण्यात आले. मात्र, एवढ्या रक्कमेतून बंधाऱ्याचे काम होऊ शकत नसल्याचे प्रभुगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com