सहा वर्षांपासून ‘त्या’ रस्त्याचे बांधकाम अपूर्ण

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

बायणा ते सडा आणि बोगदापर्यंत बांधण्यात येणारा ९ किलो मीटर अंतराचा रस्ता गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून बांधला जात असल्याने त्याचे काम सहा वर्षांपासून का रखडले

मुरगाव: बायणा ते सडा आणि बोगदापर्यंत बांधण्यात येणारा ९ किलो मीटर अंतराचा रस्ता गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून बांधला जात असल्याने त्याचे काम सहा वर्षांपासून का रखडले, ह्याचा खुलासा महामंडळाच करू शकते असा पवित्रा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने घेतला आहे.

गोव्यातील शेतकऱ्यांची दिल्ली आंदोलनाकडे कुच -

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या  महामार्गाचे काम सहा वर्षांपासून रखडल्याप्रकरणी खुलासा मागितला होता. तथापि, हे काम गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून केले जात असल्याने तेच योग्य खुलासा करू शकते असे बांधकाम खात्याचे म्हणणे आहे. काम रखडल्याबाबतचा खुलासा गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने करावा, असा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे.
२०१४ पासून मुरगावमध्ये गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून ३२ कोटी रुपये खर्चून बायणा ते सडा-बोगदा पर्यंतच्या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पण, ते काम अद्याप पूर्ण होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ह्या रस्त्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत का ठेवले आहे, याची चौकशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करावी, अशी मागणी मुरगावातील जनतेने केली आहे. सडा येथील आरटीआय कार्यकर्ते दामोदर दिवकर यांनी याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे  आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा:

मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन -

सहा वर्षे झाली, तरीही २५ टक्केही काम नाही
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बायणा ते सडा-बोगदा पर्यंतच्या ९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा प्रारंभ २६ ऑक्टोबर २०१४ रोजी सडा येथे समारंभपूर्वक करण्यात आला होता. ३२ कोटी खर्चून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे बगीचे, रस्ता रुंदीकरण, बसथांबे, बांधण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले होते. दीड वर्षात हा महत्त्वपूर्ण रस्ता बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. पण, सहा वर्षे उलटूनही या रस्त्याचे २५ टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

बायणा येथून ते राजेश्वरी बंगल्यापर्यंत एमपीटीच्या कुंपणाला लागून गटार बांधून सहा वर्षे झाली आहे. पण, रस्त्याचे काम केलेले नाही. या कॉंक्रीटच्या गटारावरील लोखंडी सळ्या तशाच ठेवल्याने घातक बनल्या आहेत. बोगदापासून ते सडा मार्केट प्रकल्पापर्यंतही कॉंक्रीटचे गटार बांधलेले आहेत. त्याच्या वरच्या सळ्या धोकादायक बनल्या आहेत. 
- नझीर खान (राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते)

संबंधित बातम्या