अनमोड ते रामनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत

वेळेत काम पूर्ण न झाल्यास वाहने रुतून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न
National Highway from Anmod to Ramnagar
National Highway from Anmod to RamnagarDainik Gomantak

एकनाथ खेडेकर

अनमोड ते रामनगरपर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी रस्ता खोदकाम चालू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पुर्ण व्हायला पाहिजे होते; पण अजूनपर्यंत ते पुर्ण न झाल्याने यंदाही पावसाळ्यात या रस्त्यावरुन जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे. एखादी चारचाकी किंवा अवजड वाहन रस्त्यावर खोदकाम केलेल्या मातीत रुतल्यास वाहतूक कोंडीचाही प्रश्न होऊ शकतो.

जोयडा तालुक्यातील जनतेला यंदाही पावसाळ्यात रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूल बांधण्यासाठी आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. रामनगर ते अनामोड, कॅसरलॉक जंक्शन आणि अनमोड ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यालगतची ड्रेनेजची कामे अपूर्ण आहेत.

National Highway from Anmod to Ramnagar
New Parliament Murals: नव्या संसद भवनाला गोमंतकीय कलेचा ‘हात’

पंट्या पुलाजवळील रस्त्याला पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडलेले असतात. पुढे रामनगर ते खानापूर या रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे या वेळी पावसाळ्यातही हा रस्ता वाहतुकीसाठी सर्व वाहनांना धोकादायक बनणार आहे.

अनमोडमार्गे या रस्त्यावरून अवजड वाहने चालू केल्याने नवीन तयार केलेला रस्ताही खचून जातो व मोठमोठे खड्डेही निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा अवजड वाहतुकीसाठी बंद करावा तसेच कर्नाटक प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही जोयडा, कॅसरलॉक तसेच रामनगर येथील ग्रामस्थ करीत आहेत.

139 कोटी मंजूर

बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खानापूर ते रामनगर आणि रामनगर ते अनमोड या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ठेकेदारांकडून दिरंगाई होत आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी १३९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून मे 2024 ची मुदत देण्यात आली आहे.

National Highway from Anmod to Ramnagar
Goa Raj Bhavan : साहित्यिकांच्या मदतीसाठी राजभवन तत्पर : राज्यपाल पिल्लई

रस्त्यावर पाणी शिंपडावे

पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक ठिकाणचे रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण होईल, अशी जनतेची अपेक्षा होती; परंतु कुठलेही काम पूर्ण झालेले दिसत नाही. या रस्त्यावर पूर्ण माती असल्याने वाहने गेल्यानंतर धूळ उडते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्रास होतो. तेव्हा ठेकेदाराने या रस्त्यावर टँकरद्वारे पाणी शिंपडावे, जेणेकरून धूळ होणार नाही, असे रामनगर येथील वासुदेव अयप्पा यांनी सांगितले.

"जेव्हापासून जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. तेव्हापासून या वाहनांमुळे काही ठिकाणी चांगले रस्तेही खराब होत आहेत. या रस्त्याला जोडलेल्या सर्व गावांतील रहिवाशांना पावसाळ्यात रस्ता खचल्याने त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा प्रशासनाने याचा पुन्हा विचार करावा."

राजेश देसाई, ग्रामस्थ, अनमोड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com