गोव्यातील प्रकल्पांच्या कामांना लागलाय ‘ब्रेक’

Work on projects has taken a break  in Goa
Work on projects has taken a break in Goa

डिचोली: डिचोलीतील विविध महत्वाच्या विकास प्रकल्पांना कोविडचा फटका बसला असून मार्गी लागलेले काही प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्पांच्या कामांना सध्या ‘ब्रेक’ लागला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील मार्च महिन्यात लागू केलेल्या टाळेबंदी काळात विविध विकास प्रकल्पांच्या कामात ‘ब्रेक’ पडला आहे. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतरही महत्वांच्या विकास प्रकल्पांच्या कामांना चालना मिळालेली नाही. मागील पावणेदोन वर्षात मिळून साळ येथील नियोजित वीज उपकेंद्र, डिचोली शहरातील ‘मॉडर्न फायर स्टेशन’ (अत्याधुनिक अग्निशमन दल), शाळा इमारत, स्ता सौंदर्यीकरण मिळून ६३ कोटीहून अधिक खर्चाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत, तर पायाभरणी करण्यात आलेले डिचोली नदीवरील बंधारा आणि अत्याधुनिक कदंब बसस्थानक प्रकल्पांचे काम अद्यापही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.


गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे सुमारे ११.२८ कोटी खर्चून डिचोली अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक केंद्र इमारत (मॉडर्न फायर स्टेशन) बांधण्यात येत आहे. मागील वर्षी १६ जानेवारी रोजी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आदी काही कारणांमुळे या प्रकल्पाचे काम जवळपास आठ महिने रेंगाळले होते. नियोजित अग्निशमन केंद्र इमारत प्रकल्प हा कुडचडे केंद्राच्या धर्तीवर बांधण्यात येणार असल्याने कुडचडेनंतर राज्यातील अशाप्रकारचा हा दुसरा प्रकल्प ठरणार आहे. डिचोलीतील नियोजित केंद्रासाठी औद्योगिक वसाहत परिसरात ५,४७९ चौरस मीटर जागा संपादीत करण्यात आली असून २,४८० चौरस मीटर जागेत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात प्रशासन विभाग, प्रशिक्षण वर्गखोली, परिषद खोली, वाचनालय, जीम आदी अत्याधुनिक साधनसुविधांबरोबरच एकाचवेळी चार बंब पार्कीग करण्यासाठी जागा, दलाचे जवान आणि नागरिकांसाठी पार्कींग तळाची सोय असणार आहे. आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी या प्रकल्पाचे काम सुरू होऊन सध्या त्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. मात्र, टाळेबंदीपासून या प्रकल्पाच्या कामावर परिणाम झाला आहे. सध्या या प्रकल्पाचे काम सुरू असले, तरी ते अत्यंत संथगतीने आणि मोजकेच मजूर काम करताना दिसून येत आहे. 

साळ येथील वीज उपकेंद्र
सुमारे ३२ कोटी रुपये खर्चून साळ येथे २२/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात येत आहे. नियोजित वीज उपकेंद्रासाठी चौदा वर्षांपूवी भू - संपादन करण्यात आले होते. मात्र, काम रखडले होते. मागील वर्षी ७ जानेवारी रोजी या कामाची कोनशिला बसविल्यानंतर काही दिवसांनी या वीज उपकेंद्राचे काम मार्गी लागले होते. टाळेबंदी काळात या प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर आता या प्रकल्पाचे काम संथगतीने काम चालू झाले आहे. हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर साळ गावासह कासारपाल, मेणकुरे आदी जवळपासच्या भागातील वीज समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे लांबणीवर पडलेले काम पाहता, ते कार्यान्वित कधी होणार याची साळ आणि आजुबाजूच्या परिसरातील जनतेला प्रतीक्षा आहे.

आणखी वाचा:


शाळा प्रकल्प पुन्हा रखडला ेवर्षापूर्वी हाती घेण्यात आलेले शहरातील केंद्र शाळा इमारतीचे काम सध्या जोरात सुरू होते. आधीच प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आल्यानंतर जवळपास सव्वादोन वर्षे प्रकल्पाचे काम रखडलेले होते. जवळपास सव्वादोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरवात करण्यात आली आहे. ४ हजार २४८.६५ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यावर १० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले, तरी आता काम रखडल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com