गोव्यातील खाण कामगारांचा प्रश्न न सोडवता खनिज वाहतूक सुरु केल्याने कामगार आक्रमक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

खाण कामगारांचा प्रश्न न सोडवता खाण कंपनीने आज पासून खनिज वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने खाण कामगारांनी विरोध केला.

कुडचडे :  खाण कामगारांचा प्रश्न न सोडवता खाण कंपनीने आज पासून खनिज वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने खाण कामगारांनी विरोध केला. कुडचडे पोलिसांनी सुमारे नव्वद पेक्षा जास्त कामगारांना ताब्यात घेऊन कुडचडे पोलीस स्थानकात नेले. जागेअभावी त्यांना केपे पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले असून कामगारांनी स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांच्या विरोधात संताप व्यक्त करीत घोषणा दिल्या.

गोवा बोर्ड परीक्षा 2021: दहावीची  गोवा बोर्डाची परीक्षा 20 मे पासून

8 फेब्रुवारीला खाण अवलंबितांनी मोर्चा काढत 15 मार्चच्या आत खाण व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास 16 मार्चला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.  सर्वोच्च न्यायालयाने खाणी पुन्हा बंद करून तीन वर्षे झाली. त्यामुळे खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. अशा परिस्थितीत कामगारांचे प्रश्न न सोडवता खनिज वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने कामगार संतापले आहेत. 

गोव्यात चोवीस तासांत 42 जण कोरोनामुक्त 

संबंधित बातम्या