मुरगाव बंदरात ट्रकच्या धडकेत कामगार जागीच ठार

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

मुरगाव बंदरात गुरुवारी पहाटे ट्रकच्या धडकेने एक पादचारी ठोकर देऊन कामगार ठार झाला.

दाबोळी : मुरगाव बंदरात गुरुवारी पहाटे ट्रकच्या धडकेने एक पादचारी ठोकर देऊन कामगार ठार झाला. ट्रक चालकाने पादचाऱ्याला ठोकर देऊन पळण्याचा प्रयत्न केला असता त्याला मुरगाव बंदरातील सुरक्षारक्षकांनी अटक करून मुरगाव पोलिसांच्या ताब्यात दिला.

मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मुरगाव बंदरात प्रगती इंजिनिअरिंग कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला एका ट्रकने धडक देऊन पसार झाला. अपघात झाल्‍यावर कामगार घटनास्‍थळीच ठार झाल्‍याची माहिती मुरगाव बंदरातील कामगारांना समजतात त्यांनी ट्रक क्रमांक केए- 22 सी 4315 चा वाहन चालक विशाल राजेंद्र माजगावकर (34) याला ताब्यात घेतले.

अपघातात ठार झालेला कामगार सूरज शिवराज सिंग (24) राहणारा उत्तर प्रदेश याला निष्काळजीपणाने वाहन चालवून ठार केल्याबद्दल पोलिसांनी विशाल माजगावकर (बेळगाव) याच्या विरोधात भा.द. स. 279, 304 अ, तर कलम 134(अ, ब) अटक केली. तर ठार झालेला कामगाराचा मृतदेह शवचिकित्सा करून मडगाव हॉस्पिसीयो इस्पितळात ठेवण्यात आला आहे. मुरगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

मडगाव: वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक तर तीन युवतींची सुटका 

संबंधित बातम्या