Vedanta Mining Workers: 'आम्हाला कामावरुन कमी करु नका', कामगारांची आर्त हाक

सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची भेट घेतली.
Ganesh Gaokar
Ganesh GaokarDainik Gomantak

कोडली येथील वेदांता खाण कंपनीच्या 322 कामगारांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची भेट घेतली. आम्हा सर्व कामगारांना कामावरून कमी न करता या कंपनीचे ज्या ठिकाणी काम चालू आहे, त्या ठिकाणी पाठविण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन कामगारांनी गावकर यांना दिले.

स्थानिक खाण कामगार लक्षदीप आर्सेकर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात आम्हाला आगाऊ नोटीस दिली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांनी ऑक्टोबरपर्यंत कामावर राहा त्यानंतर कमी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून खाणीवर काम करीत आहोत. आज आमचे वयही झाले असून आम्हाला आता कुठे काम मिळणार. कंपनीच्या या नोटीसीमुळे आमची पुढील स्थिती भयानक होणार, याची चिंता वाटत आहे. तेव्हा आम्हाला न्याय द्यावा.

सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनीही कोडली वेदांता खाणीवरील कामगार आपणाला भेटले असून आमदार गणेश गावकर यांच्यासोबत कामगारांचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com