Workshop in Goa by Central Coastal Agricultural Research Institute
Workshop in Goa by Central Coastal Agricultural Research Institute

गोवा सरकार शेतीला करणार नव संजीवनी बहाल

पणजी: राज्यातील शेतीला नवि संजीवनी बहाल करत राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेतर्फे माती दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी मातीशी निगडित कार्यशाळेचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. या कर्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीचे महत्वसुद्धा पटवून देण्यात येणार आहे. 


२०२२ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याहेतू आता कृषी खाते, पशुसंवर्धन खाते, मस्त्योद्योग खाते आणि राज्य फलोत्पादन मंडळाने केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय) सोबत कार्यरत आहे. सीसीएआरआयच्या माध्यमातून राज्यात एकात्मिक शेतीची वेगळी ओळख लोकांना करून देण्यासाठी  प्रयत्न केले जात आहेत. सुपारी, नारळ, केळी यासारखी वेगवेगळी पिके घेण्याच्या पद्धती आणि त्यासंबंधित मातीशी निगडित माहितीसुद्धा देण्याचे कार्य सीसीएआर करीत आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com