
World Cleanup Day 2023: किनारपट्टी भागात पर्यटन हाच स्थानिकांच्या रोजगाराचा प्रमुख स्राेत असून किनाऱ्यांना भेट देण्यासाठीच हे पर्यटक येत असतात.
अशावेळी किनारे अस्वच्छ राहिल्यास पर्यटक त्यांच्याकडे पाठ फिरवतील आणि त्याचा वाईट परिणाम स्थानिक व्यावसायिकांना भोगावा लागेल, असा इशारा देतानाच त्यामुळेच किनारे साफ ठेवण्यासाठी स्थानिकांनी स्वत: सक्रिय व्हायला पाहिजे, असे आवाहन केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केले.
‘वसुंधरा दिना’चा कार्यक्रम म्हणून केळशी पंचायत, केळशी जैवविविधता व्यवस्थापन समिती यांनी गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केळशी किनारा सफाईचा कार्यक्रम हाती घेतला.
एकूण चार ठिकाणी सुमारे ३०० कार्यकर्त्यांच्या मदतीने ही मोहीम राबवून सुमारे एक टन प्लास्टिक कचरा एकत्र केला. या सफाई मोहिमेत स्वत: सरपंच वाझ यांनी भाग घेतला होता.
‘प्लास्टिक’वर चर्चासत्र
यावेळी प्लास्टिक विरोधी माेहिमेचा भाग म्हणून ‘वसुंधरा आणि प्लास्टिक’ याविषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस तसेच गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमुकादम यांनी भाग घेतला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.