World Environment Day: आयुष्याचा सर्वोत्तम आनंद अनुभवा दक्षिण गोव्यातील बटरफ्लाय बीचवर

World Environment Day: आयुष्याचा सर्वोत्तम आनंद अनुभवा दक्षिण गोव्यातील बटरफ्लाय बीचवर
Butterfly Beach in Goa

जागतिक पर्यावरण दिन विशेष (World Environment Day)

गोव्यातील बटरफ्लाय बीचबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

जाणून घेऊया काही रंजक माहिती >>

काय हटविता हटतो सागर, हटेल एकीकडे
उफाळेल तो दुसरीकडुनी, गिळूनि डोंगर कडे।


माणूस स्वतःचा परिसर व जीवनाधार नष्ट करून स्वतःलाच अडचणीत आणत आहे. जीवनसृष्टीचा पृथ्वीवरील कालखंड म्हणजे दिवसाचे 24 तास मानले तर माणसाची आतार्यंतची कारवाई शेवटच्या एखाद्या मिनिटाची. तुम्हाला आयुष्याचा सर्वोत्तम अनुभव घ्यायचा असेल तर दक्षिण गोव्यातील सुंदर बटरफ्लाय बीचला नक्कीच भेट द्या.(Do you know about Butterfly Beach in Goa)

तुम्हाला माहिती आहे का?
या बीच वर विविध प्रजातीचे फुलपाखरं पाहायला मिळतील
फुलपाखरांमुळेच या बीचचे नाव 'बटरफ्लाय बीच' असे पडले आहे 
गोव्यातील हा प्रसिद्ध बीच 'हनिमून बीच' म्हणून देखील ओळखला जातो.

पणजी पासून बटरफ्लाय बीचला कसे जाता येईल? 
•    बटरफ्लाय बीचला थेट पोहचणे शक्य आहे
•    तुम्हाला पणजी ते पालोलेम बीच पर्यंत टॅक्सी करावी लागेल
•    हे अंतर कमीतकमी 1 तास 30 मिनिटाचं आहे
•   पालोलेम बीच वर पोहोचल्या नंतर तुम्हाला बोट राइड्ची सुविधा उपलब्ध आहे.

बटरफ्लाय बीचला गेल्यावर काय पाहता येईल?
•    तुम्ही जर लो टाइड पिरियड पर्यंत थांबला तर तुम्हाला समुद्री अर्चिन, 
रेडफिश, गोल्डफिश हे सर्व समुद्री प्राणी पाहायला मिळतील 
•    या बीच वर तुम्हाला विविध प्रकारचे फुलपाखरं पाहायला मिळतील 
•    या शिवाय तुम्हाला डॉल्फिन्स देखील पाहायला मिळतील.

सृष्टीने काही खास अभिदाने देऊन माणसाला एक विस्मयकारी क्षमतांचा प्राणी बनविला. त्याने उन्मत भस्मासूर बनून वरदात्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला तर सृष्टीस माणसाला भूतलावरून नाहीसा करण्यास या शेवटच्या मिनिटानंतर एक सेकंदही लागणार नाही. तेव्हा मानवी आयुष्य समृध्द करणाऱ्या निसर्गाला त्याने निमार्ण केलेल्या सौंदर्याला विसरून चालणार नाही 
तेव्हा आजूबाजूच्या पर्यावरणाची आणि स्वतः ची नेहमी काळजी घ्या.!

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com