जागतिक नेत्रदान दिन विशेष...नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान

 World Eye Donation Day Special ... Eye donation is the best donation

World Eye Donation Day Special ... Eye donation is the best donation

पणजी: आज जागतिक नेत्रदान दिन. नेत्रदान हेच श्रेष्‍ठदान असे म्हटले जाते, याला कारणही तसेच आहे. आपल्‍या डोळ्यांनी आपल्‍यानंतर कोणीतरी हे जग पहावे, असे वाटल्‍यास प्रत्‍येकाने नेत्रदान करायला हवे. अनेकांना नेत्रदान करण्‍याची इच्‍छा असते. मात्र त्‍यांना कसे करायचे हेच माहित नसते. जर तुम्‍हाला तुमचे नेत्र मरणोत्तर दान करायचे आहेत, तर रोटरी क्‍लबच्‍या कोणत्‍याही शाखेशी संपर्क साधा. काही महिन्‍यांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सोटो म्‍हणजेच राज्‍य अवयव आणि पेशी दान विभागाची सुरवात करण्‍यात आली असून तुम्‍ही येथेही नेत्रदानाबाबतीत माहिती घेऊ शकता.

ज्या लोकांना बुब्बुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे, अशा लोकांनाही नेत्रदानाचा फायदा होतो. त्यालाच कॉर्नियल ब्लाइंडनेस असे म्हणतात. नेत्रदानानंतर केवळ डोळयाच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते, पूर्ण डोळा बदलला जात नाही.

घडाळ्याच्या तबकडीवर ज्याप्रमाणे संरक्षक काच असते, त्याचप्रमाणे डोळयामध्ये पूर्ण पारदर्शक आवरण असते. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. मुख्यत: बाहेरील प्रकाशकिरण डोळयात जाऊन दृष्टी प्राप्त होते. ज्यावेळी हे पारदर्शक बुब्बुळ अपारदर्शक होते, तेव्हा साहजिकच अंधत्व येते.

या अंधत्वाची अनेक कारणे असतात जसे की डोळयाला होणारी इजा उदा. बुब्बुळाला होणाऱ्या या जखमा, दिवाळीमध्ये असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्शन (जंतू प्रादुर्भाव) मुळे, डोळयात काही केमिकल्स गेल्यास अशीही कारणे असतात. मिळालेल्‍या माहितीनुसार गोव्‍यात अंधत्‍वाची समस्‍या नेत्रदानाचे वेळी काळीजीही घ्‍यावी लागते हि काळजी मृत व्‍यक्‍तीच्‍या नातेवाईकांना किंवा त्‍यांच्‍या जवळच्‍यांना घ्‍यावी लागते. जसे की मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे, तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रूमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी. आपल्या डॉक्टरकडून डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) तयार ठेवावा. डोळयातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाचे आत काढावे लागतात. त्यामुळे जवळील नेत्रपेढीस त्वरित फोन करून कळवावे.

जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते.

नेत्रदान कोण करू शकतो?

१. नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते.

२. बालकापसून वृध्दांपर्यत कोणीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

३. ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात.

४. नेत्रदानास कुठल्याही धर्माचा विरोध नाही.

नेत्रदान कोण करू शकत नाही?

१. एड्सचे रूग्‍ण

२. हिपाटेटिस (ल्व्हिरचे आजार),

३. सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव),

४. ब्लड कॅन्सर, इ. चे रुग्ण.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com