World Heart Day: दर 33 सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराचा ठरतोय बळी

वाळपईत आरोग्य केंद्रात जागतिक ह्रदय दिन उत्साहात साजरा
World Heart Day
World Heart DayDainik Gomantak

Valpoi: बदलती जीवन शैली व अन्न पध्दत यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे, तसेच वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पुरक ठरत आहेत. हृदयविकाराचे प्रमाण बघितले तर प्रत्येक 33 सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु पावतो.

मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत व प्रत्येक मधूमेह रुग्णास हृदयविकार असल्याचे गृहित धरतोच. एकूणच जगभरातील सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आहेत. आणखी एक बाब म्हणजे भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम आहे; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दुसरं म्हणजे दहा वर्षापूर्वी चाळीशीच्या खालील एखाद दुसर्‍या रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने इस्पितळात भरती व्हायचा.आता मात्र, शंभरातील 30 रुग्ण हे हमखास चाळीशीच्या खालील असतात.

World Heart Day
Goa Corona Update: गोव्यात 249 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 37 नव्या रूग्णांची नोंद

वाळपईत आरोग्य केंद्रात जागतिक ह्रदय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी व्यासपीठावर डॉ. रुपचंद्र नावेलकर, अकिब शेख, विदेश जल्मी, पन्ना नाईक, उज्वल्ला पार्सेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. वाळपई शासकीय आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत वाडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ह्रदयाची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य - डॉ. अभिजित वाडकर

डॉ. अभिजीत वाडकर म्हणाले, "आपण हृदयरोग टाळण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. पण हृदयरोगाला टाळू शकणार नाही असे दोन घटक असतात, ते म्हणजे वय व अनुवांशिकता. या जोखिमा टाळता येणे शक्य नाही. पण जसंजसे वय वाढते किंवा अनुवांशिकदृष्टीने हृदयविकाराची संभावणा असल्याचे लक्षात आले, तर टाळता येण्यायोग्य घटकांवर कार्य केले पाहिजे."

"टाळण्यायोग्य घटकांमध्ये रक्तदाब व मधुमेह, धूम्रपान व बदलती जीवनशैली आणि लठ्ठपणा व उच्च कोलेस्ट्रॉलची मात्रा या बाबींचा समावेश होतो. योग्य दिनचर्या व आहाराने या जोखिमा निश्चितच टाळता येतात. विशेष म्हणजे वय वाढत असताना, या जोखिमांना टाळण्यासाठी कार्य केले पाहिजे." असे प्रतिपादन वाळपई शासकीय आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत वाडकर यांनी आज जागतिक ह्रदय दिन वाळपई आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले.

World Heart Day
NCB Raid : कारवाईचा धडाका सुरुच; ब्राझीलमधून गोव्यात आणला जाणारा कोकनचा साठा जप्त

डॉ. वाडकर पुढे म्हणाले, सरकारने तसेच आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्याबरोबर सत्तरी तालुक्यात आरोग्य क्षेत्रातील विविध सुविधा पुरवुन समाजात एक क्रांती निर्माण केली आहे. वाळपई आरोग्य केंद्रात एक्यूट कोरोनरी सिंड्रोमची सोय केल्यामुळे कित्येक जणाचे प्राण वाचले आहे. ह्या मशीनचे कनेक्शन वैद्यकीय महाविद्यालय असुन कुठल्याही रुग्णाची तपासणी केल्यास त्याचा रिकोड थेट बांबोळीत होत असतो त्यामुळे काही क्षणातच ह्रदय विकासाच्या लक्षणाकडे तातडीने उपचार होतात. व पुढील उपचासाठी रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालय पाठविता येत. त्यामुळे सर्वांनी आपल्या ह्रदयाची काळजी योग्य प्रकारे घ्यावी. व इस्पितळात उपलब्ध केलेल्या सुविधाचा फायदा घ्यावा असे डॉ. वाडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com