काबाडकष्टाने पिकवलेल्या भातशेतीचे पूजन

मनोदय फडते
रविवार, 9 ऑगस्ट 2020

भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाचे अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळेच भारतातील अधिक जमीन ही शेतीसाठी वापरात आणली जाते. शेती ही भारताची परंपरा. शेती पिकवणे आणि ती वाढवणे हे बळीराजाच्या योगदानावरच अवलंबून आहे. काबाडकष्ट आणि घाम गाळून पिकवलेल्या भातशेतीची पूजन करून त्याच्या कणसाची विधीवत पूजा करणे हाही परंपरेचाच भाग आहे. त्यामुळे घाम गाळून पिकवलेल्या भातशेतीचे काकोडा-कुडचडे भागात विधीवत पूजन करण्यात आले.

कुडचडे

घरात धनधान्याची वृद्धी व्हावी म्हणून बळीराजाने पिकविलेल्या धान्याची पूजा करून समृद्धीचे प्रतीक म्हणून भाताची कणसे आपल्या दारावर पूजा करून बांधली जातात. याला श्रावण कृ. पंचमी (नया पंचम) म्हणून ओळखली जात असते. 
घामाकष्टाने उभी केलेली भातशेती पोटरीला येताच त्याची पूजा करून श्रावण पंचमीला भाताची कणसे समाधान आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपल्या दरवाजाच्यावर विधिवत पूजन करून ते बांधले जातात. काहीजण हेच भाद्रपद पंचमी दिवशी समृद्धीचे प्रतीक पूजन करून बांधतात. 
काकोडा-कुडचडे येथील श्री धानुघाडी मंदिरासमोर असलेल्या भातशेतीची विधीवत पूजन करून त्याची कापणी करतात. कुडचडे येथील महादेव मंदिरात त्याचबरोबर इतर प्रमुख ठिकाणी हे कापलेले समृद्धीचे प्रतीक पुजारी घेऊन जात असतो. त्या-त्या भागातील लोक हे नवे आपल्या घरी घेऊन जातात. शास्त्रपद्धतीने पूजन करतात आणि आपल्या घरात वर्षभर समृद्धी राहू दे, अशी प्रार्थना करतात. बळीराजाने पिकविलेल्या धनधान्याची पूजा करून आज खास करून कष्टकरी समाज आपल्या घरी नया पंचम हा उत्सव मोठ्या आनंदाने गोडदोड पदार्थ करून साजरा करतात. 
काकोडा येथील श्री धानुघाडी मंदिरा समोरील देवाच्या भातशेतीतील कणसे कापून पुजारी ठरलेल्या आपापल्या भागातील जनते साठी उपलब्ध करून देत असतात. काहीजण भाद्रपद पंचमीलाही भातशेतातील कणसाचे पूजन करतात.

संपादन ः संदीप कांबळे

Goa Goa Goa

संबंधित बातम्या