माजी सरपंच चोडणकर यांच्या घरी गणपती ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन
चोडणकर कुटुंबीय शंकर पार्वतीचे पूजन करतानाDainik Gomantak

माजी सरपंच चोडणकर यांच्या घरी गणपती ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन

चोडणकर यांच्या घरात गणपती आणून ठेवला. मात्र त्या त्याचे पूजन करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे तो गणपती मंदिरात नेवून ठेवला.

मोरजी/ निवृत्ती शिरोडकर :

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)म्हटल्यावर सर्वत्रच गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. तसेच धूम धडाक्यात हा उत्सव (Celebration)साजरा केला जातो. चोपडे येथील माजी सरपंच एकता एकनाथ चोडणकर यांच्या घरी नागपंचमीला नाग पूजन केले जात नाही, शिवाय चतुर्थीच्या काळात गणपती ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन केले जाते.

उठा उठा हि सकळीक वाचे स्मरा गजमुख ! रिद्धी – सिद्धीचा नायक सुखदायक भक्तांसी !!

या गजराने दिवसाचा आरंभ होतो. अंगी शेंदुराची उटी माखलेला, विशाल उंदरावर बसलेला ,नाग्बंदाची शोभा मिरवणारा आणि मोदकाची वाटी घेवून समाधानात रमलेला अश्या अनेक प्रकारे गजाननाचे रूप भक्तगणांना परिचित आहे .

चोडणकर कुटुंबीय शंकर पार्वतीचे पूजन करताना
अतिउत्‍साह नडला! मोरजी समुद्रात कार चालविण्‍याचा थरार!

पेडणे महालात (Pedne Mahal)लहान मोठ्या आकाराचे सुबक मूर्तीचे घरोघरी पूजन करतात. तसेच भजन, पूजन, नामस्मरण केले जाते. परंतु चोपडे येथे चोडणकर यांच्या घरी गणपती ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन केले जाते. या चोडणकर यांच्या एका कुळातील मंडळी शंकर पार्वती पूजतात, त्यांच मुळ घर गुडे शिवोली येथे आहे. मात्र गुडे शिवोली येथे काही चोडणकर मंडळी गणपती पूजतात .यांची हि परंपरा ५०० पेक्षा जास्त वर्षाची आहे.

या विषयी चोडणकर बोलताना म्हणाले, चोडणकऱ्यांच्या जाणत्यांनी एकदा गणपती देवळात ठेवला होता, गणपती पूजायचा तर चोडणकर कुटुंबातील सर्वजण एकत्रित येणे शक्य नव्हते ,सा संबधी जाणकारांनी देवाला सांगणे केले असता शंकर पार्वती पूजा म्हणून प्रसाद झाला. त्यानुसार शंकर पार्वतीचे पूजन केले जात आहे .

तसेच, नागपंचमीला नाग (Nagpanchami)पूजला जात नाही, याची माहिती देताना सांगितले जाते की, त्यावेळी नाग करण्यासाठी माती नव्हती म्हणून तो पिठाचा केला, हा पिठाचा नागोबा मांजराने पळवला, त्यानंतर नाग पूजला जात नाही, मात्र चतुर्थीलाच शंकराच्या गळ्यात जो नाग असतो त्याचीच त्या दिवशी पूजा केली जाते .

या बाबतची हकीकत सांगताना ते म्हणाले, अनेक वर्षापासून चतुर्थीच्या अगोदर कुटुंबातील काही लोकाना मृत्यू होत होते. त्यामुळे गणपतीत सुतक यायचे ,याबाबत देवाजवळ विचारणा केली असता शंकर पार्वतीला पूजा, असा कौल दिला गेला. तेव्हापासून या कुटुंबात शंकर पार्वतीची पूजा केली जाते .

चोडणकर कुटुंबीय शंकर पार्वतीचे पूजन करताना
मोरजी ते पणजी कदंबा बससेवा सुरु

माजी सरपंच एकता चोडणकर यांनी याबाबदल माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले एकाने एकदा चोडणकर यांच्या घरात गणपती आणून ठेवला. मात्र त्या काळात त्याचे पूजन करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे तो गणपती मंदिरात नेवून ठेवला. काही वर्षा नंतर चोडणकर कुटुंबियांची गणेश पूजन करण्याची इच्छा झाली, देवाकडे कौल घेतला, परंतु त्याना कौल झाला पण गणेश पूजना ऐवजी शंकर पार्वतीचे पूजन करण्यास मान्यता मिळाली. त्या वर्षापासून हे पूजन केले जाते.शिवाय चोडणकर कुटुंबियातील सर्वच सदस्य भजन आरती स्वता करतात. सर्व प्रकारची वाद्ये जशी पुरुषमंडळी वाजवते त्याच प्रमाणे महिलाही सदस्या वादन करतात.

नागपंचमीला नागोबाची पूजा नाही :

नागपंचमीच्या दिवशी चोडणकर कुटुंबियांच्या घरात नागोबाची पूजा केली जात नाही. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, नागपंचमीच्या दिवशी पूर्वजांनी पिठाचा नागोबा करून ठेवला होता. तो नागोबा मांजेराने पळविला. नागोबा मांजराने पळवल्याने अपशकून झाल्यामुळे त्या दिवशी नागोबा पुजला नाही, चतुर्थीच्या दिवशी शंकराच्या गळ्यात जो नागोबा असेल त्यांचीच त्या दिवशी पूजा करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com