लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री मारिया आवरोरा कुतो यांचे निधन

कौटोच्या लेखन कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या ग्रॅहम ग्रीन बद्दलच्या 1986 च्या पुस्तकाने झाली.
लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री मारिया आवरोरा कुतो यांचे निधन
Padma Shri Maria Aurora Couto Passed AwayPic credit: Frederick Noronha

मडगाव : जागतिक दृष्ट्रीकोन असलेल्या विचारवंत आणि प्रसिद्ध भारतीय साहित्यिक पद्मश्री मारिया आवरोरा कुतो (80) यांचे आज सकाळी बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये अल्प काळाच्या आजाराने निधन झाले.

आपल्या 'गोवा (goa) : अ डोटर्स स्टोरी' या आत्मचरित्रपर पुस्तकामुळे संपुर्ण भारतात गाजलेल्या हळडोणा स्थित या लेखिकेला सर्दीचा त्रास व्हायला सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वी गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल करण्यात आले होते.

Padma Shri Maria Aurora Couto Passed Away
मुख्यमंत्री भंडारी समाजाचाच हवा मागणीला जोर

तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना आज सकाळी 10 च्या सुमारास त्यांचे निधन झाले अशी माहिती त्यांच्या परिचित वर्तुळातून मिळाली. त्यांच्या मागे तीन पुत्र व एक कन्या असा परिवार असून गोव्याचे माजी मुख्य सचिव स्व. आल्बन कुतो यांच्या त्या पत्नी होत्या.

व्यवसायाने निवृत्त प्राध्यापिका असलेल्या आवरोरा कुतो यांनी इंग्रजी मधून विपुल साहित्य निर्माण केले असले तरी त्या कोंकणी भाषा आणि साहित्याच्या खंद्या समर्थक होत्या. एक सहृदयी विदुषी म्हणून त्या परिचित होत्या. गोव्यात डी. डी. कोसंबी विचार महोत्सव सुरू करण्यामागे त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन 2010 साली केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार (Awards) देऊन गौरव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com