गोव्यातील पंचायत सचिव पदांसाठी होणारी लेखी परीक्षा येत्या रविवारी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

गोवा सरकारने पंचायत सचिव पदे भरण्यासाठी रविवारी आयोजित केलेली लेखी परीक्षा नियोजीत वेळी होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात येईल अशा चर्चा होत्या.

पणजी: गोवा सरकारने पंचायत सचिव पदे भरण्यासाठी रविवारी आयोजित केलेली लेखी परीक्षा नियोजीत वेळी होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्यात येईल अशा चर्चा होत्या, परंतु सरकारने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. परीक्षा रविवारी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत सहा परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पंचायत सचिव पदांसाठी रविवारी (ता. 28) सकाळी 10 ते 11.30 या वेळेत उत्तर गोव्यातील सहा परीक्षा केंद्रांवर लेखी परिक्षा घेण्यात येतील. सरकारी पॉलीटेक्निक पणजी, डॉन बॉस्को हायस्कूल पणजी, सेंट मायकल हायस्कूल ताळगाव, रोझरी हायस्कूल कुजिरा बांबोळी, डॉ. के. ब. हेडगेवार हायस्कूल कुजिरा बांबोळी आणि मुष्टीफंड हायस्कूल कुजिरा बांबोळी येथे या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

उमेदवारांना यासंदर्भात पत्रेही पाठवण्यात आलेली आहे. राज्यात सरकारने सध्या मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू केली असून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी येत्या डिसेंबरपर्यंत राज्य प्रशासनातील दहा हजार रिक्त पदे भरण्यात येतील असे जाहीर केले आहे. सध्या विविध खात्यांनी यासाठी जाहिराती देणे सुरू केले आहे. कर्मचारी भरतीसाठी कर्मचारी भरती आयोग सरकारने नेमला आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरील भरती हाताळणे त्या आयोगाला शक्य होणार नाही यासाठी आयोगाकडून ना हरकत दाखला घेऊन सरकार खातेनिहाय भरती खात्याकडून करवून घेत आहे. विविध खात्यांच्या कार्यालयासमोर नोकर भरतीचे अर्ज घेण्यासाठी आणि ते भरून सादर करण्यासाठी बेरोजगार युवक युवतींची सध्या मोठी गर्दी होत आहे. पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात सध्या दीड लाख युवक-युवती बेरोजगार असल्याची नोंद सरकारच्या रोजगार विनिमय केंद्रात आहे.

भारत बंदला गोव्यातून प्रतिसाद नाही; भारतात 1500 ठिकाणी करणार निषेध 

उमेदवारांना मुलाखतीसाठी पत्रेही पाठविण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांना अजून पत्रे मिळालेली नाहीत त्यांनी उद्या (ता. 27) ऑनलाईन अर्जाच्या पोचपावती प्रतीसह पंचायत संचालनालयाच्या कार्यालयातून आपली पत्रे घेऊन जावीत, असे माहिती आणि प्रसिद्धी खात्याने कळविले आहे.

गोव्यात कळंगुटच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश 

संबंधित बातम्या