गोवाः यंदा माशेल- खांडोळ्यात बारावीसाठी परीक्षा केंद्र

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या २४ एप्रिलपासून सुरु होण्याच्या बारावीच्या  परीक्षेसाठी यंदा माशेल केंद्र सुरू करण्यात आले आहे.

माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या २४ एप्रिलपासून सुरु होण्याच्या बारावीच्या  परीक्षेसाठी यंदा माशेल केंद्र सुरू करण्यात आले आहे. माशेल परीक्षा केंद्राचे प्रमुख म्हणून प्रा. गीतांजली परब, तर निरीक्षक म्हणून प्रा. दयानंद भगत यांनी निवड गोवा शालान्त मंडळाने केली आहे. परीक्षचे पेपर सकाळी 9.30 वा. सुरू होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी केंद्रावर येणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांचे थर्मलगने तापमान तपासले जाणार आहे. तसेच मास्क आवश्यक आहे. सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे लागणार आहेत, अशी माहिती केंद्रप्रमुख प्रा. गीतांजली परब यांनी सांगितली. (This year, examination center for class XII in Mashel-Khandola)

एनडीएचा राजीनामा देऊन विजय सरदेसाई यांनी प्रामाणिकपणा दाखवला

माशेलात दोन ठिकाणी परीक्षा होणार आहे. केंद्र क्र. 1 - सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात खांडोळा येथे कॉमर्स 55997 ते 56105, 69028, 69029 एकूण 111 विद्यार्थी. सायन्स 56106 ते 56195 एकूण 90 विद्यार्थी. केंद्र क्र. 2 - शारदा इंग्लिश हायस्कूल, माशेल येथे कला शाखा - 55832 ते 55996 एकूण 164 विद्यार्थी. व्यावसायिक शाखा - 56196 ते 56265, 69030 एकूण 71 विद्यार्थी. अशा प्रकारे आसन व्यवस्था आहे.

संबंधित बातम्या