गोव्यात यंदा या दोन शहरांमध्येच होणार कार्निव्हल महोत्सवाचं आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राज्यातील कार्निव्हल महोत्सव पणजी व मडगाव शहरातच आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पणजी :  राज्यातील कार्निव्हल महोत्सव पणजी व मडगाव शहरातच आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इतर शहरातील कार्निव्हल महोत्सव कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पणजी व मडगाव शहरात कोरोन संसर्ग नाही का, असा प्रश्‍न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा महोत्सवच यावर्षीसाठी रद्द करण्याची मागणी केल्याने या कार्निव्हल महोत्सव होणार की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान सरकारने या महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी मंजूर केला आहे. पणजीतील कार्निव्हल महोत्सवाच्या मिरवणूक मार्गावरून वाद सुरू झाला आहे.

वीज खात्यातील कर्मचाऱ्यांना गोवा खंडपीठाने दाखवला घरचा रस्ता

पणजी महापालिका व स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी या मिरवणुकीसाठी दिवजा सर्कल ते कला अकादमीपर्यंतचा मार्ग निवडण्याची मागणी केली आहे, तर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या कोंडीच्या कारणाखाली त्याला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अजूनही मिरवणूक मार्गाचा प्रश्‍न सुटलेला नाही. या आठवड्यात 13 फेब्रुवारीला पणजीत कार्निव्हल आयोजित करण्याची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.गोव्यात 13 आणि 14 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आलेला कार्निव्हल रद्द केला जावा अशी मागणी पणजीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

उत्तराखंड दुर्घटनेमुळे केंद्रीय मंत्री अमित शहांचा गोवा दौरा रद्द

पणजीतील सांबा स्क्वेअर भागात चार दिवसाचा कार्निवल आयोजित केला जाऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना महामारी अद्याप संपुष्टात आलेली नाही. लोक मुखावरणे वापरत नाहीत, शारीरिक अंतराचे बंधन पाळत नाहीत. यामुळे कार्निवल महोत्सवात मोठी गर्दी होईल आणि कोविडचा प्रसार सगळीकडे होईल. कोविड महामारीतून सगळ्यांना वाचवण्यासाठी यंदा सरकारने कार्निव्हल साजरा करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या