यंदाचा मान्‍सून समाधानकारक.

dainik gomantak
मंगळवार, 12 मे 2020

सध्‍याचे वातावरण लक्षात घेतले असता १३ मे पासून बंगालच्‍या उपसागराच्‍या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्‍याचे संकेत आहेत. या कमी दाबाच्‍या क्षेत्राची तीव्रता वाढून नैऋत्‍य मोसमी वाऱ्यांना चालना मिळणार आहे. ज्‍यामुळे १६ मे पर्यंत मान्‍सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होण्‍यास पोषक स्‍थिती आहे.

पणजी, 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार यंदाचा मान्‍सूनच्‍या प्रवासासाठी दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होण्‍यास पोषक स्‍थिती आहे. त्‍यामुळे १६ मे रोजी मान्‍सून अंदमानात दाखल होण्‍याची शक्‍यता आहे. सरासरी आकडेवारीला गृहित धरून मोजमाप केले असता आणि मान्‍सून सक्रियतेसाठी योग्‍य हवामान असल्‍यास मान्‍सून १ जून रोजी केरळ आणि ७ जून रोजी गोव्‍यात दाखल होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
ूदेशात मान्‍सूनाचे आगमन १ जून होणार आहे. त्‍यानंतर मान्‍सून देशात इतर राज्‍यात सक्रिय होतो. हवामान तज्‍ज्ञांच्‍या म्‍हणण्‍यानुसार यावर्षीचा मान्‍सून समाधानकारक असणार आहे.
सध्‍याचे वातावरण लक्षात घेतले असता १३ मे पासून बंगालच्‍या उपसागराच्‍या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्‍याचे संकेत आहेत. या कमी दाबाच्‍या क्षेत्राची तीव्रता वाढून नैऋत्‍य मोसमी वाऱ्यांना चालना मिळणार आहे. ज्‍यामुळे १६ मे पर्यंत मान्‍सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होण्‍यास पोषक स्‍थिती आहे.
गोव्‍यातील दिवसभराचे वातावरण कोरड्या स्‍वरूपाचे होते. १3 ते १५ रोजी वादळवाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे. राज्‍यात गेल्‍या चोवीस तासात ३५.२ अंश सेल्‍सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोक उष्‍म्‍याने हैराण झाले असून पावसाची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या