Goa Rain Updates: राज्यात बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी

तामिळनाडूत चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. त्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होत आहे.
Goa Rain Updates: राज्यात बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी
Yellow alert issued in Goa till Wednesday Dainik Gomantak

पणजी: राज्यात बुधवारपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानुसार काल उत्तर गोव्यासह राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावत राज्याला झोडपून काढले. केरळमध्ये शनिवारपासून कमी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तेथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूत चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. त्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर होत आहे.

राज्यातील म्हापसा, कोलवाळ, पेडणे, बांबोळी, साखळी, डिचोली, वाळपई या परिसरांसह राजधानी पणजीला आज पावसान झोडपून काढले. काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिक आणि पर्यटकांची ऐन सुट्टीच्या दिवशी तारांबळ उडाली. विजेची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान वेधशाळेचे अधिकारी राहुल मोहन यांनी केले आहे.

Yellow alert issued in Goa till Wednesday
रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाचा अखेर श्रीगणेशा..!

समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा, कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली होती, त्यानुसार गोव्यात आज मुसळधार पाऊस पडला. यामुळे वाहतुकीवर आणि जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com