मडगाव आणि केपे पालिका निवडणूक आप लढवणार - राहुल म्हांबरे 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

प्रतिमा कुतिन्हो यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपची ताकद वाढली असून मडगावसह केपे पालिका निवडणुकीत आप पूर्ण जोमाने उतरणार आहे.

मडगाव : मडगाव व केपे पालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) नेटाने उतरणार असून या दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत आपचा प्रभाव दिसून येईल असे आपचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी सांगितले. 

प्रतिमा कुतिन्हो यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपची ताकद वाढली असून मडगावसह केपे पालिका निवडणुकीत आप पूर्ण जोमाने उतरणार आहे. मडगावात आधी शेडो कौंसिल सोबत काही उमेदवार निश्चित केले होते. आता मडगावच्या सर्व 25 ही प्रभागात उमेदवार उभे करण्यात येतील, असे म्हांबरे यांनी सांगितले. (You will contest Madgaon and KP municipal elections  Rahul Mhambare)

प्रतिमा कुतिन्होंना उमेदवारी दिलेल्या काॅंग्रेस नेत्यांबद्दल फालेरोंची नाराजी 

मडगाव पालिका क्षेत्र मडगाव, फातर्डा व कुडतरी मतदारसंघात येते. कुडतरी मतदारसंघातील आपची समिती तीन प्रभागांत काम करत आहे, तर मडगाव व फातोर्डात येणाऱ्या प्रभागांसाठी आपची मडगाव व फातोर्डा समित्या एकत्र काम करत आहेत. सर्व प्रभागातील उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली. 

केपे पालिका निवडणुकीसाठी आपचे पॅनल तयार करण्यात पॅट्रीसिया फर्नांडिस यांनी पुढाकार घेतला आहे. रद्द झालेल्या निवडणुकीच्या वेळीही केप्यात आपचे उमेदवार होते. केप्यातही आता होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत आपचा बऱ्यापैकी प्रभाव जनतेला दिसणार आहे, असा विश्वास म्हांबरे यांनी व्यक्त केला. 
 

संबंधित बातम्या