मडगावचे नगराध्यक्षपद युवा नगरसेवकाला?

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

सरदेसाई यांचे संख्याबळ जास्त असल्याने ते आपल्या गटातील नगरसेवकास नगराध्यक्षपद द्यावे या मताचे आहेत.

फातोर्डा: मडगाव नगरपालिका निवडणुकीचा निकाल (Election Result) लागून आठ दिवस उलटले तरी नगराध्यक्ष ठरविण्यासाठीची बैठक अजून निश्र्चित झालेली नाही. आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांचे 9, आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांचे 8, भाजपच्या व्हायब्रंट मडगाव समितीचे सात व एक अपक्ष नगरसेवक असे मडगाव नगरपालिकेत संख्याबळ आहे. सरदेसाई व कामत यांनी निवडणुकीपूर्वी युती केली होती. दोन्ही गटात मिळून चारपेक्षा जास्त नवनिर्वाचीत नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने प्रत्येकाने त्यासाठी आपले लॉबिंग सुरू केले आहे असे कळते. (The young corporator will get the post of Mayor of Madgaon)

पणजीत कोविड किटसाठी रुग्णांची ससेहोलपट

सरदेसाई यांचे संख्याबळ जास्त असल्याने ते आपल्या गटातील नगरसेवकास नगराध्यक्षपद द्यावे या मताचे आहेत. त्यामुळे अजुन नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराचे नाव निश्र्चित होऊ शकलेले नाही.सरदेसाई यांच्या गटातील माजी नगराध्यक्ष पुजा नाईक, लिंडन परेरा व राजू नाईक तर कामत यांच्या गटातील घनश्याम शिरोडकर, दामोदर शिरोडकर हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

जर नगराध्यक्षपदासाठीच्या नावावर एकमत होऊ शकले नाही, तर कदाचित तडजोडीचा उमेदवार म्हणून एखाद्या उमद्या, युवा व प्रथमच निवडून आलेल्या नवनिर्वाचीत नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे.दरम्यान, व्हायब्रंट मडगाव समितीच्या एका पदाधिकाऱ्यांशी यासंबंधी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आमचे नगरसेवक एकसंध आहेत. शिवाय आमचा कामत किंवा सरदेसाई यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. मतदारांनी जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य असून विरोधात बसूनच मडगावचा विकास करण्यास प्राधान्य देणार आहे.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

संबंधित बातम्या