डिचोलीतील युवकाने विहिरीत उडी मारून संपविली जीवनयात्रा 

डिचोलीतील युवकाने विहिरीत उडी मारून संपविली जीवनयात्रा 
Bicholim

डिचोली: विहिरीत उडी मारून एका 28 वर्षीय अविवाहित युवकाने आपली जीवनयात्रा संपविण्याची दुर्दैवी घटना डिचोलीत घडली. दुर्दैवी युवकाचे नाव गिरीराज गुरूदास परब असे आहे. मूळ मये येथील गिरीराज आपल्या कुटुंबियांसहीत बोर्डे वडाजवळ आपल्या नातेवाईकाकडे राहत होता.(A young man from Bicholim committed suicide by jumping into a well)

काल मध्यरात्री त्याने तो राहत असलेल्या घराजवळील विहिरीत उडी मारली. या घटनेमागील नेमके कारण समजू शकले नसले, तरी घरगुती कारणास्तव त्याने हे दुर्दैवी पाऊल उचलल्याची चर्चा चालू आहे.  डिचोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com