कळंगुटमध्ये तरुणाने केला ज्येष्ठ नागरिकाचा खून

जोजफ फर्नांडिस याला गडेकर यांनी मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला.
कळंगुटमध्ये तरुणाने केला ज्येष्ठ नागरिकाचा खून
Young man kills senior citizen in Calangute Dainik Gomantak

कळंगुट: सावतावाडा-कळंगुट येथील जोजफ फर्नांडिस या ज्येष्ठ नागरिकाचे डोके सिमेंट काँक्रिट बांधकामावर तीन -चारवेळा आदळून त्याच्या मृत्‍यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून नितीन गडेकर (38) या संशयित तरुणास कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना पूर्ववैमनस्‍यातून घडल्‍याचे पोलिसांनी सांगितले. नितीन दीना गडेकर (38) व एलिझाबेथ फर्नांडिस त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी तेथे आलेल्या जोजफ फर्नांडिस याला गडेकर यांनी मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Young man kills senior citizen in Calangute
गोव्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

सावतावाडा-कळंगुट येथील जोजफ फर्नांडिस (57) या वृद्धाचे डोके सिमेंट काँक्रिट बांधकामावर तीन-चारवेळा आदळल्याचे पोलिसांनी सांगितले. सावतावाडा - कळंगुट येथील नितीन दीना गडेकर (38) हा संशयित रविवारी दुपारी पावणेदोन वाजण्‍याच्या सुमारास आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नी असलेल्या एलिझाबेथ फर्नांडिस यांना त्या या भागात चालवत असलेल्या रेस्टॉरंटमध्‍ये भेटण्‍यास आला होता. यावेळी त्यांच्यात असलेल्या पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि गडेकर यांनी एलिझाबेथ यांना त्यांच्या केसांना धरून जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. एलिझाबेथचे किंचाळणे ऐकून तेथे धाव घेतलेल्या जोजफ फर्नांडिस यांच्यावर नितीनने जोरदार हल्ला चढवित त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्याला खाली पाडून तेथील सिमेंट कॉक्रिटच्या बांधकामावर सलग तीन-चार वेळा जोजफचे डोके आदळवून त्याला गंभीर जखमी केले.

Young man kills senior citizen in Calangute
...अन्यथा आज मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर गोवा शिक्षकांचा ठिय्या

या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्‍वरित जखमी जोजफला उपचारासाठी बांबोळीच्या ‘गोमेकॉ’त पाठविले. परंतु, या मारहाणीत डोक्याला जबर मार बसलेल्या जोजफची वाटेत रस्त्यातच प्राणज्योत मालवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com