नेत्रावळी गावात त्या घरातील एकमेव तरुणावर काळाने घातली झडप

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

नेत्रावळी गावात जिथे उपजिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला होता, त्या घरातील एकमेव तरुणाचा कोविडमुळे बळी  गेल्याने  गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगे: नेत्रावळी गावात जिथे उपजिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन जाहीर केला होता, त्या घरातील एकमेव तरुणाचा कोविडमुळे बळी  गेल्याने  गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोविडचा 42 वर्षीय पहिला बळी गेल्याने आज संपूर्ण नेत्रावळी गावाला कोविडच्या भयानक संसर्गाची दहशत काय ती कळून आली आहे. अवघ्या सात दिवसापूर्वी घरात मंगलकार्य उरकण्यात आले होते.

त्या मंगलकार्याची संपूर्ण जबाबदारी या तरुणाने उचलली होती. त्यानंतर अंगात ताप वाढू लागल्याने उपचारासाठी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. जेमतेम पाच दिवस उपचार घेण्यात येत असताना काळाने झडप घातली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. 

गोवा: कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी 

कोविडचा संसर्ग आजही नेत्रावळीत काही लोक सहज घेत आहेत. घरात पॉझिटिव्ह रुग्ण असताना त्याच घरातील माणसे आपल्याला काही झाले नाही या भावनेने गावात फिरत आहेत. त्यांना कोण समजावून सांगणार. परिस्थितीचा परिणाम नसलेले काहीजण अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत.

आज नेत्रावळी गावात 38 रुग्ण संख्या झाली आहे. त्यात एकाचा पहिला बळी गेला. या संसर्गाची व्याप्ती वाढू नये म्हणून स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. शासकीय पातळीवर अजून नेटाने प्रयत्न करून संसर्ग रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज नेत्रावळीतील लोक व्यक्त करीत आहेत. आज नेत्रावळी बाजारात पूर्णतः बंद पाळण्यात आला आहे.

Goa Lockdown: कदंब बससेवा, मासळी मार्केट सात ते सात सुरू 

संबंधित बातम्या