Goa: लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणींनी निसंकोचपणे पुढे यावे

या योजनेचा लाभ करून देण्यात आल्याच माहिती त्यांनी दिली तथापि येत्या महिन्याभरात आणखी शंभर तरुणींना या योजनेचा लाभ प्राप्त होणार असल्याचे पालयेंकर यांनी यावेळी सांगितले.
Goa: लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणींनी निसंकोचपणे पुढे यावे
शिवोलीतील लाडली लक्ष्मी योजनेतर्गत लाभार्थांसमवेत आमदार विनोद पालयेंकर संतोष गोवेकर.

शिवोली : कुठल्याही घरातील मुलीचे पैशाअभांवी शुभकार्य अडवू नये या उदात्त हेतूने सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या लाडली लक्ष्मी (Ladli Lakshmi) या योजनेचा लाभ (Benefit of the scheme)घेण्यासाठी तरुणींनी (young women) निसंकोचपणे पुढे येण्याचे आवाहन शिवोलिचे आमदार तथा माजी मंत्री विनोद दत्ताराम पालयेंकर (MLA former minister Vinod Dattaram Palayenkar) यांनी शिवोलीत केले. दांडा -शिवोली येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या लाडली लक्ष्मी धनादेशांचे वितरण करतेवेळी पालयेंकर बोलत होते. 

आपल्या आमदारकी तसेच मंत्रीपदाच्या कार्यकाळात आतापर्यंत आठशेच्या आसपास तरुणींना या योजनेचा लाभ करून देण्यात आल्याच माहिती त्यांनी दिली तथापि येत्या महिन्याभरात आणखी शंभर तरुणींना या योजनेचा लाभ प्राप्त होणार असल्याचे पालयेंकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शनिवारी आयोजित कार्यक्रमात एकशे एकावन्न लाभार्थीना लाडली लक्ष्मी धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंजुर झालेल्या धनादेशांचा स्वीकार करण्यासाठी निवासस्थानी आलेल्या सर्व तरुणी तसेच नव विवाहीतांचे आमदार विनोद पालयेंकर यांच्या कुटुंबियांकडून मिठाई वाटपाने त्या़चे स्वागत करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com