'युवक काँग्रेस' लोकविरोधी धोरणे उघडकीस आणेल - अमित पाटकर

भाजप सरकारवर युवक काँग्रेसचा वॉचडॉग असेल
Goa YOUTH CONGRESS
Goa YOUTH CONGRESSDainik Gomantak

पणजी: गोवा प्रदेश युवक काँग्रेस संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद मार्डोळकर यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची कामगिरी चोख बजावली आहे. मला विश्वास आहे की, युवक काँग्रेस भाजप सरकारवर वॉचडॉग राहील आणि त्यांची लोकविरोधी धोरणे आणि घोटाळे उघडकीस आणेल, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. (YOUTH CONGRESS WILL BE WATCHDOG ON BJP GOVERNMENT - AMIT PATKAR )

Goa YOUTH CONGRESS
गोवा पंचायत निवडणुक: ओबीसी आरक्षणाचा फैसला उद्याच

पणजी येथे गोवा प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी अमित पाटकर बोलत होते. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव श्रीमती रिची भार्गव आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद मार्डोळकर आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Goa YOUTH CONGRESS
Calangute: इलेक्ट्रॉनिक दुकानात कामगाराकडून 12 लाखांची अफरातफर

या कार्यक्रमात बोलताना अ‍ॅड. वरद मार्डोळकर म्हणाले की, "युवा जोडो बूथ जोडो" मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कठोर परिश्रम करू. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तरुण महिलांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com