कुत्रा आडवा आल्याने अपघात; युवक जागीच ठार

बुलेटचालकाचे नियंत्रण सुटले आणि तो जागीच कोसळला.
कुत्रा आडवा आल्याने अपघात; युवक जागीच ठार
accident caseDainik Gomantak

फोंडा: धाटवाडा उसगाव येथील एमआरएफ कंपनीसमोर राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक कुत्रा आडवा आल्याने बुलेटचालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे तो जागीच कोसळला. अपघातग्रस्त युवकाने हेल्मेट परिधान केले नव्हते.

accident case
आणि गोव्‍यातील सिंबा नावाचा कुत्रा पोहचला पोलंडला.

सिध्देश्‍वरनगर तिस्क -उसगाव येथील उत्तम चक्रबहादुर धामी (वय 30) असे या युवकाचे नाव आहे. तो बुलेटने (क्र. जीए. 05 क्यु 0420) फोंडामार्गे औद्योगिक वसाहत वेर्णा येथे कामाला जात होता. राष्ट्रीय महामार्गावर बेवारस कुत्रा आडवा आल्याने तो दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. धामी हा विवाहित असून त्याला आठ महिन्यांचा मुलगाही आहे. या घटनेची माहिती तिस्क आऊट पोलिस स्‍थानकावर कळताच घटनेचा पंचनामा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com