रुमडामळ दवर्ली येथे तरुणाचा खून

police
police

सासष्टी

पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात मुजाहिदखान खानजादे (22 वर्षे) या तरुणाचा खून होण्याची घटना गुरुवारी रात्री रुमडामळ दवर्ली येथे घडली. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी सादीक उर्फ लोली आणि इस्माईल मुल्ला उर्फ छोटू या संशयीतांना अटक केली आहे. त्यांनी सुऱ्याने भोसकून मुजाहिदखान याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

मायणा कुडतरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भगवती काॅलनी - रुमडामळ दवर्ली येथे मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान ही घटना घडली. सादीक, इस्माईल आणि मुजाहिदखान यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादातून झालेल्या भांडणात दोन्ही संशयितांनी मिळून सुरवातीला मुजाहिदखान याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर त्याच्या पोटात सुरा खुपसला. गंभीर जखमी अवस्थेत मुजाहिदखान हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. तथापि, तिथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी मुजाहिदखान याचा भाऊ कबीरखान खानजादे (३०) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयीतांवर भादंसंच्या कलम 302 खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com