युवक ही कॉंग्रेसची ताकद: ॲड. म्हार्दोळकर

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

युवक ही कॉंग्रेसची ताकद आहे. युवा कार्यकर्तेच राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आणण्याची किमया करू शकतात, असे उद्‍गार प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी काढले. 

डिचोली : युवक ही कॉंग्रेसची ताकद आहे. युवा कार्यकर्तेच राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आणण्याची किमया करू शकतात, असे उद्‍गार प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी काढले. 

कॉंग्रेसतर्फे साखळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲड. म्हार्दोळकर बोलत होते. कॉंग्रेसचे साखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली डेल्मॉन सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी प्रदेश युवा कॉंग्रेसचे सचिव गौतम भगत, साखळी मतदारसंघाचे युवा अध्यक्ष रियाज सय्यद, डिचोली गट युवा अध्यक्ष मनोज नाईक, ग्रेन काब्राल, गौतम प्रियोळकर, रोहन पालकर, अमित घाडी, फरहान अख्तार आदी उपस्थित होते. भाजप सरकारमुळे राज्यात बेकारी वाढत असल्याची टिका गौतम भगत यांनी करून युवावर्ग कॉंग्रेसकडे वळत असल्याचे नमूद केले. साखळीतील युवा आणि ज्येष्ठ संघटीतपणे कॉंग्रेसचे कार्य वाढवावे, असे आवाहन मंगलदास नाईक यांनी स्वागतपर भाषणात केले. या मेळाव्यास युवा कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

संबंधित बातम्या