कळंगुट येथे अपघातात युवक ठार, एक जखमी

दुचाकीची सिव्हरेज टँकरला धडक
youth was killed and another injured in an accident at calangut
youth was killed and another injured in an accident at calangutDainik Gomantak

म्हापसा: कळंगुट येथे दुचाकीने सिव्हरेज टँकरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका सतरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. मयूर डेगवेकर (रा. मुड्डीवाडा-साळगाव) असे त्याचे नाव आहे. तर त्याच्यासोबत असलेला अमन शिरोडकर (21, साळगाव) हा गंभीर जखमी झाला.

(youth was killed and another injured in an accident at calangut)

youth was killed and another injured in an accident at calangut
बुस्टर डोस न घेतलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी रात्री 11.45 च्या दरम्यान डॉल्फीन सर्कलनजीक घडला. एका सिव्हरेज टँकरला दचाकीने जोरदार धडक दिली होती. जखमी शिरोडकर याच्यावर सध्या गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत. तो गंभीर जखमी असल्याने दुचाकी कोण चालवत होते आणि अपघात नेमका कसा घडला याची माहिती मिळू शकली नाही. उपनिरीक्षक राजाराम बागकर आणि हवालदार प्रशांत चोपडेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. कळंगुट पोलिस तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com