Goa Congress Rebel : काँग्रेस फुटल्यानंतर आता विरोधी पक्षनेत्याचे काय होणार?

संभ्रम कायम; कार्लुस फेरेरा, युरी आलेमाव यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा
Yuri Alemao and Carlos Ferreira
Yuri Alemao and Carlos FerreiraDainik Gomantak

Goa Congress Rebel : आठ आमदार भाजपमध्ये गेल्‍यानंतर काँग्रेसचे तीनच आमदार शिल्लक राहिलेत. यामुळे विधिमंडळ गटनेतेपदासाठी हळदोणेचे आमदार ॲड.कार्लुस फेरेरा आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्यापैकी एकाची निवड होणार आहे. परंतु काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार का?, असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे.

यासंदर्भात ॲड.कार्लुस फेरेरा यांनी सांगितले, राज्य विधानसभेच्या नियमानुसार सभागृहात सत्ताधारीच्या पक्षानंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला प्रमुख विरोधी पक्ष मानला जातो. त्याच पक्षातील विधिमंडळ गटनेत्याला सभापतींनी मंजुरी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते पद दिले जाते. दरम्यान, आमदार फुटले असले तरी अजूनही काँग्रेसचा विधिमंडळ गटनेता निश्‍चित झालेला नाही. पक्षांतर झाल्यानंतर आज, गुरुवारी गोवा प्रदेश काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव राज्यात येऊन बैठक घेणार आहेत. यावेळी विधिमंडळ गटनेता निश्‍चित करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. मायकल लोबो यांची हकालपट्टी करून दोन महिने उलटले तरी पक्षाचे विधिमंडळ गटनेतेपद रिक्तच होते.

Yuri Alemao and Carlos Ferreira
Goa Cabinet Expansion : गोवा राज्य मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट

विलिनीकरण तपासणार

आठ आमदारांनी नेमके कोणते दस्तावेज सादर केले आणि पक्ष विलिनीकरण प्रक्रिया हे कायदेशीररित्या तपासणार असल्याचे काँग्रेसने सांगितले. आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले, 2019 मध्ये पक्षाच्या विधिमंडळ गटाचे विलिनीकरण झाले होते, तेव्हा माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आव्हन दिले होते. त्यावेळी गोवा खंडपीठाने सभापतींचा निवाडा ग्राह्य धरला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. पण खंडपीठाच्या निवाड्याच्या आधारावर सध्या आमदार फोडण्याचे सत्र सुरू आहे.’

पाच वर्षांत काँग्रेस चारवेळा फुटली

गोव्यात गेल्या पाच वर्षांत काँग्रेस हा चारवेळा फुटला आहे. 2017 च्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होऊनही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या राजकीय डावपेचांमुळे काँग्रेसच फुटली. तेव्हा विश्‍वजीत राणेंचा एक गट बाहेर पडला. त्यानंतर काही काळाने दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकर यांनी पक्षाला ‘हात’ दाखवला. 2019 मध्ये पक्षाचे 10 आमदार भाजपात आले. तर आता आठ आमदार भाजपवासी झालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com