Goa Assembly: 'म्हादई'वर बोलताना आलेमाव यांच्यासह ढवळीकरांनी सादर केल्या 'मराठी' कविता, पाहा व्हिडिओ

म्हादईच्या प्रस्तावावर बोलताना राज्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी तसेच, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपले विचार मांडले.
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak

गोवा हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात राज्यात सध्या तापत असलेल्या म्हादईवर जोरदार चर्चा सुरू आहे. म्हादईच्या प्रस्तावर बोलताना सत्ताधारी नेत्यासह विरोधी पक्षांनी आपली मते आक्रमक पद्धतीने मांडली.

म्हादईच्या प्रस्तावावर बोलताना राज्याचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी तसेच, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आपले विचार मांडले. दरम्यान, दोघांनीही आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली तसेच, मराठीतील कवितेचा देखील उल्लेख केला.

Goa Assembly
Goa Assembly Sessions:...म्हणून आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सभागृहाबाहेर काढले

ढवळीकरांनी सादर केली मराठी कविता!

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हादई प्रस्तावावर आपल्या भाषणाची सुरूवात मराठीत केली. 'मी मराठीत बोलू का, कळते ना सर्वांना?' असे ढवळीकर यांनी सभागृहाला विचारले. सर्वांनी होकार दिल्यानंतर त्यांनी मराठीत भाषण केले. ढवळीकरांनी म्हादई म्हणजे आपली 'आई' असे म्हणत म्हादईवर एक कविता सादर केली.

'प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सुंदर म्हादई आई' अशा आशयाची कविता सुदिन ढवळीकर यांनी सादर केली.

युरी आलेमाव काय म्हणाले?

विरोधीपक्षनेते युरी आलेमाव म्हादई प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असे म्हणत आपल्या भाषणाची सुरूवात केली. म्हादई आपली आई आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Goa Assembly
Goa Assembly Session 4th Day Live Update: सभागृहात 'म्हादई'वर चर्चा सुरू, जाणून घ्या क्षणाक्षणाची अपडेट

वीरेश बोरकर सभागृहातून बाहेर काढले.

सभागृहात म्हादईवर चर्चा सुरू असताना आमदार वीरेश बोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेले पत्र वाचण्यास सुरूवात केली. दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी बोरकर यांचा माईक बंद केला. बोरकर पत्र घेऊन सभापतीच्या आसनाकडे गेले यावेळी सभागृहातील मार्शलांनी त्यांना रोखले व सभागृहातून बाहेर काढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com