Yuri Alemao : कुंकळ्ळीच्या विकासाची उद्दिष्टे निश्चित

प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घेणार असल्याची आमदार युरी आलेमाव यांची माहिती
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

Yuri Alemao : कुंकळ्ळी मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कोणताही विकास झालेला नाही. मागील दहा वर्षांत संपूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या अनेक समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणे आवश्यक आहे. कुंकळ्ळीच्या विकासासाठी आम्ही आता अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित केली आहेत, असे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले.

कुंकळ्ळी मतदारसंघातील नवनिर्वाचित पंचायत सदस्यांसह सार्वजनिक बांधकाम, जलसंसाधन, वीज आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आम्ही योग्य पाठपुरावा करून सर्व कामे वेळेत पूर्ण करू. सर्व पंचायत सदस्यांनी कुंकळ्ळीच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून एकसंध राहून काम करावे, असे युरी आलेमाव म्हणाले.

माकाझान, गिरदोली, चांदर, आंबावली, पारोडा व बाळ्ळी येथील बहुतेक सरपंच, उपसरपंच व पंचायत सदस्यांनी या बैठकीला उपस्थित राहून आपापल्या पंचायत क्षेत्रातील लोकांच्या विविध समस्या मांडल्या. आम्ही प्राधान्यक्रम ठरवू आणि कामे हाती घेऊ, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

Yuri Alemao
Siddhi Naik Case : ‘सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्या’

सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, वीज आणि कृषी खात्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित असलेल्या आमच्या पंचायत सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांची व समस्यांची दखल घेतली आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

सहकार्याचे आवाहन

माझ्या मतदारसंघातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. विकासकामे राबविताना सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे मी नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com