गोवा फॉरवर्डचे युरी आलेमाव यांचा राजीनामा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

गोवा फॉरवर्ड पक्षाचे युरी आलेमाव यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गोवा फॉरवर्डकडून कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होती, मात्र आज अचानक पणे त्यानी राजीनामा दिला.

पणजी :  गोवा फॉरवर्ड पक्षाचे युरी आलेमाव यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गोवा फॉरवर्डकडून कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा होती, मात्र आज अचानक पणे त्यानी राजीनामा दिला. युरी आलेमाव काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी सांगे मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर लढविली होती यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. युरी आलेमाव यांचे वडील ज्योकीम आलेमाव हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. त्यांचे काका चर्चिल आलेमाव हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. युरी आलेमाव हे आता काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे मानले जात आहे, मात्र ते कोणत्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या