आमदार प्रशिक्षण शिबिराबाबत युरी आलेमाव यांचे गंभीर आरोप!

एका खासगी संस्थेमार्फत पंचतारांकीत हॉटेलात आमदार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे
आमदार प्रशिक्षण शिबिराबाबत युरी आलेमाव यांचे गंभीर आरोप!
MLA Yuri AlemaoDainik Gomantak

मडगाव :आगामी विधानसभा अधिवेशनात एका प्रश्नाला केवळ पाच उप-प्रश्न विचारण्याचे बंधन घातल्यानंतर आता लोकशाहीविरोधी भाजप सरकारने आमदारांचे मन विचलीत करण्यासाठी तारांकीत प्रश्न विचारण्याचे दिवस म्हणुन जाहिर केलेल्या 27 व 28 जून रोजीच भाजपशी संलग्न एका खासगी संस्थेमार्फत पंचतारांकीत हॉटेलात आमदार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे असा गंभीर आरोप आमदार व कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी केला आहे.

(Yuri Alemao serious allegations about MLA training camp in goa)

MLA Yuri Alemao
पणजीतील सामान चोरीप्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी

पणजीच्या ताज व्हिवांता या पंचतारांकीत हॉटेलात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या सहकार्याने दोन दिवसीय शिबीराचे आयोजन केल्याचे निमंत्रण विधीमंडळ सचिवालयाने आज मला पाठविले आहे. गोवा विधानसभा संकुलात सर्व सुविधा उपलब्ध असताना पंचतारांकीत हॉटेलात हे शिबीर का असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे व पैशांची उधळपट्टी करण्याच्या भाजपच्या धोरणाचाच हा भाग असल्याचे म्हटले आहे.

सरकारने लोकशाही तत्वांचे जतन करण्यावर भर देणे गरजेचे असुन, भारतीय घटनेने दिलेले आमदारांना दिलेल्या अधिकारांचे पालन करणे सरकारचे कर्तव्य आहे. आमदारांच्या अधिकारांवर बंधन आणणे म्हणजे घटनेलाच पायदळी तुडविण्यासारखे असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

सदर दोन दिवशीय शिबीराला खास वक्ते म्हणुन निमंत्रीत केलेल्यांची नावे वाचल्यानंतर भाजपशी संबधीत लोकांनाच आमंत्रीत केल्याचे स्पष्ट होत असुन, केवळ आपल्या धोरणांचा उदो-उदो करण्यासाठी भाजप आज प्रत्येक संधीचा फायदा उठवीत आहे.

MLA Yuri Alemao
फोंड्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम

आमदार प्रशिक्षण शिबीरासाठी नेमलेली संस्था भाजपचे धोरणच राबवीते हे सर्वज्ञात असल्याचे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

आगामी विधानसभा अधिवेशनात पर्यटन, वाहतुक, पंचायत, माहिती तंत्रज्ञान अशा महत्वाच्या खात्यांवर प्रश्न विचारण्यासाठी 27 जूनची तारीख असुन, 28 जूनला सार्वजनीक बांधकाम, पर्यावरण, महसुल, रोजगार अशा खात्यांवर तिसऱ्या फेरीतील प्रश्न विचारण्याची तारीख ठरली आहे. त्यामुळे तारांकीत प्रश्न सोडुन प्रशिक्षण शिबीराला आमदारांनी उपस्थित रहावे अशी सभापती रमेश तवडकरांची अपेक्षा आहे का असा प्रश्न युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

सरकारने सदर प्रशिक्षण शिबीर सुट्टीच्या दिवशी व एखाद्या रविवारी आयोजीत करुन, आता नवीन आमदारांसाठी गरजेचे असलेल्या कामकाज नियमांशी संबधीत विषयांवरच माहिती द्यावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. 8 ते 10 जून रोजी विधानसभा संकुलात आयोजित केलेले प्रशिक्षण शिबीर सरकारने घाईगडबडीत गुंडाळले होते यावरुनच सरकारला पंचतारांकीत हॉटेलात वायफळ खर्च करुन हे शिबीर आयोजित करायचे होते हे आता उघड झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com