डबल इंजिन भाजप सरकारचा गोमंतकीयांना 'डबल' झटका

एलपीजीच्या किमतीत वाढ आणि ओबीसींना पंचायतींमध्ये आरक्षण न देण्यावरुन युरी आलेमाव यांचा टोला
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारचे 100 दिवस साजरे केले त्याच दिवशी भाजप सरकारने गोव्यातील जनतेला घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करून बक्षीस दिले हे अत्यंत दुर्दैवी आहे. पंचायत निवडणुकांबाबत सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने भाजप सरकारचा ओबीसीविरोधी अजेंडा उघड झाला आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ आणि ओबीसींना पंचायत निवडणुकांमध्ये आरक्षण न देणे हा “डबल इंजिन” भाजप सरकारने गोव्यातील जनतेला 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल दिलेला “डबल झटका” आहे, असा निशाणा कुंकळ्ळीचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी सरकारवर साधला आहे.

भाजप सरकारने जवळपास वर्षभर ओबीसींच्या आरक्षणावर कारवाई केली नाही. ओबीसी आणि बहुजन समाजाचे पंचायतीमधील हक्काचे प्रतिनिधित्व हिरावून घेण्यासाठी सरकारचे हे कृत्य जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर होते. नगरपालिका निवडणुकीच्या वेळीही त्यांनी असेच करुन नागरिकांना न्यायालयात जाण्यास भाग पाडले. गोव्यातील जनतेने आता आगामी पंचायत निवडणुकीत भाजपने समर्थन आणि पुरस्कृत उमेदवारांचा पराभव करून भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले.

भाजप सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्य दिवाळखोरीत ढकलले आहे. राज्यात आर्थिक आणीबाणी आहे. पगार देण्यासाठी सरकार दरमहा कर्ज घेत आहे. गोव्यातील लोक प्रचंड आर्थिक बोझाखाली आहेत. आज भाजप सरकारने पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीमुळे प्रत्येक घराचे बजेट कोलमडेल, असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao
प्रमोद सावंत सरकारची शंभरी; गोवेकरांना 100 दिवसात नेमकं काय मिळालं?

समाजकल्याण योजनांतर्गत गरजू लाभार्थी त्यांच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असताना कार्यक्रम आयोजित करण्यासाठी करदात्यांच्या पैशांची उढळपट्टी करण्याच्या सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. तौक्ते चक्रीवादळात सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. सरकार आपल्या अयशस्वी कारभाराचे 100 दिवस साजरे करण्यात व्यस्त असताना अंगणवाडी सेविका उपोषणावर आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

आम्ही गोव्यातील जनतेचा आवाज बनू आणि आगामी विधानसभेच्या अधिवेशनात गोव्याच्या लोकांशी संबंधित प्रत्येक मुद्दा उचलून धरू, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com