Zadani Stolen Idols: 'झाडानी'तील 14 मूर्ती म्हादईत सापडल्या, दोन मूर्तींचा शोध सुरु

सदर मूर्ती कोणी नदीपात्रात टाकल्या त्याचे अद्याप कारण समजले नाही.
Zadani Stolen Idols
Zadani Stolen Idols

Zadani Stolen Idols: नगरगाव पंचायत क्षेत्रातील झाडानी-सत्तरी येथील म्हादई अभयारण्य क्षेत्रात असलेले प्रसिध्द बसवेश्वर मंदिराच्या 16 पाषाणी मूर्ती गायब झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

गुरुवारी वाळपई पोलिसांनी झाडानी येथे जाऊन परिसराची तपासणी केली असता नदीत पात्रात पोलिसांना मूर्ती सापडल्या आहेत. एकूण 16 पैकी 14 मूर्ती मिळाल्या असून मूर्ती वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

गुरुवारी (दि.14) सकाळी वाळपई पोलीस झाडानी येथे मूर्तींचा शोध घेण्यासाठी गेले असता अनेक अडचणींना सोमोरे जावे लागले. त्यानंतर नदीत उडी घेऊन पोलिसांनी शोध घेतला असता नदीच्या पात्रात काही मूर्ती मिळाल्या. त्यानंतर संध्याकाळी वाळपई पोलिसांनी मिळालेल्या 14 मूर्ती ताब्यात घेतल्या.

सदर मूर्ती कोणी नदीपात्रात टाकल्या त्याचे अद्याप कारण समजले नाही. अजून दोन मूर्तींचा शोध लागणे बाकी आहे. सदर नदी ही म्हादई नदी असुन एकवेळ पाण्याच्या प्रवाहात मूर्ती वाहून जाण्याचीही शक्यता नाकारता येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com