जेनेटो कार्दोजची पोलिसांसमोर शरणागती 

विलास महाडिक
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणाच्या तपासावेळी त्याचे या प्रकरणाशी लागेबांधे असल्याचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या काही संशयितांनीच तशी त्याच्याविरुद्ध दिली आहे.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणाशी संबंधित संशयित जेनेटो कार्दोज याने अटकपूर्व जामिनासाठी गेल्या 
काही महिन्यांपासून न्यायालयीन लढाई सुरू केली होती. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयातही अर्ज केला होता. हा अर्ज येत्या सोमवारी (१७ ऑगस्ट) सुनावणीस येण्यापूर्वीच तो आज दुपारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याला न्यायालयात उद्या पोलिस कोठडीसाठी उभे केले जाणार आहे. 
पणजी उपविभागीय पोलिस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित जेनेटो कार्दोज हा वकिलासह आपल्या पोलिस मुख्यालयातील कार्यालयात शरण होण्यास आला होता. जुने गोवे पोलिस स्थानकाच्या प्रकरणात चौकशीसाठी हवा असल्याने त्याला त्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणाच्या तपासावेळी त्याचे या प्रकरणाशी लागेबांधे असल्याचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या काही संशयितांनीच तशी त्याच्याविरुद्ध दिली आहे. ही माहिती पडताळून पाहण्यासाठी त्याची पोलिस कोठडी पोलिसांना हवी होती. तो फरारी झाला होता तेव्हा शोध घेण्यासाठी त्याची सर्व ठिकाणी तसेच त्याच्या निवासस्थानी नजर ठेवण्यात आली होती. गोव्याच्या शेजारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये त्याचा ठावठिकाणाचा मागोवा घेतला जात होता, असे त्यांनी सांगितले. 
दरम्यान, संशयित जेनेटो कार्दोज याच्या पलायनच्या सर्व वाटा बंद झाल्याने तसेच न्यायालयाकडूनही अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यताही अंधूक बनल्याने तो आज शरण आला. या प्रकरणात पोलिसांनी २० संशयितांना अटक तसेच तिघा बाल गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहेत. त्यातील काही संशयितांना सशर्त जामीन मिळाला असला तरी त्याचे जवळचे साथीदार मोर्सेलिन व इतर हे अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे पोलिस स्थानकात दाखल आहे. त्यामध्ये हल्ले व खंडणीचा समावेश आहे. पणजी पोलिस स्थानकातही त्याच्याविरुद्ध तरुणाचे अपहरण करून त्याला धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 
 

 
 

संबंधित बातम्या