गोव्यात काल दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

 पाच महिन्यानंतर काल दुसऱ्या खेपेस राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला नाही. याच महिन्यात १५ नोव्हेंबर रोजीसुद्धा राज्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. आता राज्यातील कोरोनाबाबतची स्थती चांगली होत असल्याचे म्हणता येईल.

पणजी :   पाच महिन्यानंतर काल दुसऱ्या खेपेस राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला नाही. याच महिन्यात १५ नोव्हेंबर रोजीसुद्धा राज्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. आता राज्यातील कोरोनाबाबतची स्थती चांगली होत असल्याचे म्हणता येईल. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा कोविडमधून बरे होण्याचा दरही ९५.६६ टक्के इतका सुधारला आहे. राज्यात आजवर मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७० इतकी आहे. 
गेल्या चोवीस तासात १३६ लोकांना कोरोनाची लागण झाली तर १५७ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या एक हजार तीनशे त्रेचाळीस इतके कोविडचे सक्रिय रुग्ण आहेत.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या १९७ खाट वापरासाठी उपलब्ध आहेत तर दक्षिण गोव्यात २३२ इतकी खाटांची संख्या असून सध्या २११ खाटा उपलब्ध आहेत. काल दिवसभरात १०० लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला तर ४१ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात एक हजार सहाशे एकवीस इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले.

माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात ३३, म्हापसा आरोग्य केंद्रात ४७, पणजी आरोग्य केंद्रात ९७, चिंबल आरोग्य केंद्रात ६०, पर्वरी आरोग्य केंद्रात ८७, मडगाव आरोग्य केंद्रात ८९, कुडतरी आरोग्य केंद्रात २३, फोंडा आरोग्य केंद्रात १११ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ८६ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७२ रुग्ण इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

अधिक वाचा : 

दिशाभूल करण्यात या दोन्ही पक्षांचा हात, भाजप आणि आप एकाच नाण्याच्या दोन बाजू: डिमेलो

गोव्याच्या आयपीएससीडीएल संचालक मंडळाची बैठक ; स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांवर चर्चा

दिशाभूल करण्यात या दोन्ही पक्षांचा हात, भाजप आणि आप एकाच नाण्याच्या दोन बाजू: डिमेलो

संबंधित बातम्या