झुवारी स्फोट: पाच अधिकाऱ्यांना अटक

इंडस्ट्रियल कंपनीचे साईट सुपरवायझर ए. प्रधान यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
Zuari agro chemicals ltd company
Zuari agro chemicals ltd company Dainik Gomantak

वास्को: झुवारीनगर येथील झुवारी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीतील भीषण स्फोटात तीन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूप्रकरणी आज कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. बी. एस. उसगावकर (प्लांट मॅनेजर), जी. एस. लोटलीकर (सेफ्टी मॅनेजर),

आर. जे. सिराटे (सेफ्टी ऑफिसर), एस. बिचोलकर (सेफ्टी स्टाफ), एम. प्रभूदेसाई (सेफ्टी स्टाफ) यांना वेर्णा पोलिसांनी अटक केली. मात्र, काल अटक करण्यात आलेले बोकारो इंडस्ट्रियल कंपनीचे साईट सुपरवायझर ए. प्रधान यांची जामिनावर सुटका करण्यात आली. कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Zuari agro chemicals ltd company
Goa Mines: ऐतिहासिक लढ्याचा निर्णायक निकाल

झुवारी ॲग्रो केमिकल्स लिमिटेड कंपनीत मंगळवारी दुपारी टाकीचा बोल्ट काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याने टाकीमध्ये तयार झालेल्या गॅसचा भीषण स्फोट होऊन तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. कंत्राटदार तसेच कंपनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या निरपराध कामगारांना जीव गमवावा लागला. स्फोट झालेला प्लांट दुरुस्ती कामासाठी बंद होता. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश कारखाने आणि बाष्पक मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. तसेच चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल, अशी हमी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून बोकारो इंडस्ट्रियल वर्क्स कंपनीचे साईट सुपरवायझर ए. प्रधान यांना अटक केली होती. मात्र, आज त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले, तर झुआरी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून पाच जणांना अटक केल्याची माहिती वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिली.

मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन

स्फोटात मृत पावलेले कामगार इंद्रजीत घोष (40, पश्चिम बंगाल), रंजन चौधरी (28, बिहार), अवकाश करण सिंग (32, पंजाब) या तिघांचेही नातेवाईक आज सकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी वेर्णा पोलिस स्थानक गाठले. नंतर रितसर चौकशी केल्यानंतर या तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी हॉस्पिसियोत केल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com