आणि गोव्‍यातील सिंबा नावाचा कुत्रा पोहचला पोलंडला.

Dainik Gomantak
रविवार, 12 एप्रिल 2020

लहान सिंबा जेव्‍हा सापडला होता, तेव्‍हा त्‍याला पाठीचा कणा नव्‍हता. त्याच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचार केले पण त्याचे मागील पाय काम करु शकले नाहीत. तर व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

पणजी, 
कोरोना विषाणूच्‍या फैलावाचा परिणाम माणसांसह अनेक प्राण्‍यांवरही होत आहे. माणूस बोलू शकतो, आपल्‍या व्‍यथा मांडू शकतो, मात्र प्राणी हे करू शकत नाहीत. काणकोण येथे वास्‍तव्‍यास असणार्‍या मूळच्‍या पोलंड येथील असणार्‍या 
जारेक आणि ईव्‍हा या जोडप्‍याने प्राणीमात्रांवरील प्रेमाबाबत एक आगळावेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. पाठीचा कणा नसणार्‍या सिंबा नावाच्‍या कुत्र्‍याच्‍या पिल्‍लावर उपचार करून त्‍यांनी त्‍याला जीवनदान दिले असल्‍याने हा सिंबा आता पोलंडमध्‍ये हसतखेळत बागडत आहे. 
ाहा लहान सिंबा जेव्‍हा सापडला होता, तेव्‍हा त्‍याला पाठीचा कणा नव्‍हता. त्याच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचार केले पण त्याचे मागील पाय काम करु शकले नाहीत. तर व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र स्‍थिती अशी असूनही जारेक आणि ईव्हाने त्याचे संगोपन करण्यास सहमती दर्शविली. त्‍यांनी सिंबाला पोलंडला नेण्‍यासाठी खास परवानगी घेतली आणि आता सिंबा पोलंडमध्‍ये मजेत राहतो आहे. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाने सिंबाला प्रवासासाठीचे प्रमाणपत्र दिले होते.
 

संबंधित बातम्या