वेळीच जागे व्हा अन्यथा स्वतःच्या भूमीतून परागंदा होऊ:मनोज परब

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

शिवोली:गोमंतकीय लोक छोटी मोठ्या कारणांवरून एकमेकांना कोर्ट कचेरीत खेचतात,स्वतःचे तसेच दुसऱयाचेही आर्थिक,सामाजिक तसेच कौटुंबिक नुकसान करून घेतात.मात्र,कोणीतरी परप्रांतीय शेजारी सहज झोपडी उभारतो.अवघ्याश्या काळात एका झोपडीचे रूपांतर अनेक झोपडपट्यात होते,त्यांना जाब विचारण्याची हिंमत आमच्यात नसते उलट चोरीछुपे त्यांना त्यांचे हातपाय पसरण्यास मदत केली जाते.या प्रवृत्तीमुळेच गोमंतकीय भूमीचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.त्यामुळे वेळीच जागे व्हा अन्यथा गोमंतकीय जनतेवर स्वतःच्या भूमीतून परागंदा होण्याची वेळ येईल,असा इशारा गोवन रिव्होल्यूशनरी (क्रांतिकारी)चे प्रमुख मनोज परब यांनी क

शिवोली:गोमंतकीय लोक छोटी मोठ्या कारणांवरून एकमेकांना कोर्ट कचेरीत खेचतात,स्वतःचे तसेच दुसऱयाचेही आर्थिक,सामाजिक तसेच कौटुंबिक नुकसान करून घेतात.मात्र,कोणीतरी परप्रांतीय शेजारी सहज झोपडी उभारतो.अवघ्याश्या काळात एका झोपडीचे रूपांतर अनेक झोपडपट्यात होते,त्यांना जाब विचारण्याची हिंमत आमच्यात नसते उलट चोरीछुपे त्यांना त्यांचे हातपाय पसरण्यास मदत केली जाते.या प्रवृत्तीमुळेच गोमंतकीय भूमीचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.त्यामुळे वेळीच जागे व्हा अन्यथा गोमंतकीय जनतेवर स्वतःच्या भूमीतून परागंदा होण्याची वेळ येईल,असा इशारा गोवन रिव्होल्यूशनरी (क्रांतिकारी)चे प्रमुख मनोज परब यांनी कोळवळ-बार्देश येथे दिला. 
काळ(रविवारी)संध्याकाळी येथील खासगी सभागृहात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ९ डिसेम्बरच्या जागी २८ डिसेम्बर १९६१ हा गोमंतकाच अस्मिता आणि अस्तित्वाचा दिवस मानून साजरा करावा.त्यामुळे बिगरगोमंतकीय व्यक्तींसाठी १५ वर्षाचा असलेला रहिवासी दाखल तात्काळ रद्द करण्यात आल्या. गोव्यातील अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बिगरगोमंतकीयांच्या हातात गेलेल्या आहेत.त्यामुळे स्थानिकांना त्यांनी पिकवलेला भाजीपाला फुटपाथवर विकावा लागत आहे.याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधींनी मतांवर डोळा ठेऊन बिगरगोमंतकीयांना दिलेले पाठबळ हे होय.

"प्रत्येक माणसाने गरजू,अनाथांचे आधारस्तंभ व्हावे दिगंबर कामत;"

अनेक औदयोगिक वसाहतीत काम करणाऱ्या काही बिगरगोमंतकीय कामगारांकडून अनैतिक प्रकार घडण्याबरोबरच चोरीसारखे प्रकार घडत असल्याची भीतीही परब म्हणाले. 
कोळवळ येथे उभा राहत असलेला १२०० सदनिकांच्या प्रल्पाचा फायदा गोमंतकीय जनतेला कितपत मिळेल याबद्दल कि काही सांगता येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.या बैठकीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. 

 

संबंधित बातम्या