गोव्याचे ट्रॉलर कारवारात पकडले

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

या दोन्ही नौकावर २८ खलाशी असून त्यांच्या शरीराचे तापमान नोंद करून त्यांना नौकेवरच अलगीकरण करून राहण्यास सांगण्यात आले आहे.

चैतन्य जोशी

कारवार

कारवारलगतच्या समुद्रात एलईडी दिवे लावून मासेमारी करत असल्यामुळे गोव्यातील ड्रॅगन सी ट्रॉलर व अन्य एका मासेमारी नौकेला किनारी पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही नौका जप्त करण्यात आल्याची माहिती मत्स्योद्योग खात्याचे उपसंचालक पी. नागराज यांनी दिली.

त्यांनी सांगितले, की टाळेबंदीच्या काळात ही मासेमारी किनाऱ्यालगत करण्यात येत होती. स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी याबाबत किनारी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही नौकावर २८ खलाशी असून त्यांच्या शरीराचे तापमान नोंद करून त्यांना नौकेवरच अलगीकरण करून राहण्यास सांगण्यात आले आहे. या नौकांचा पाठलाग किनारी पोलिसांनी नौकेतून केला आणि या नौका पकडून किनाऱ्यावर आणल्या. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या खलाशांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी केली. या खलाशांत तिघेजण अंकोला येथील तर अन्य सर्व ओडिशातील आहेत.

या नौका निर्जुंतूक करूनच त्यावरील सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या