राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सज्जतेसाठी गोव्याचे प्रयत्न

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

स्पर्धा यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या गोव्यातील काही सुविधा अपूर्ण आहेत, त्यांच्या पूर्णतेवर भर देण्यात आला आहे. सध्या देशव्यापी लॉकडाऊन आहे.

पणजी,

कोरोना विषाणू महामारीचा देशातील संसर्ग आटोक्यात येऊन परिस्थिती पूर्वपदावर येण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे गोव्यातील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भवितव्य अस्पष्ट आहे. मात्र स्पर्धेच्या सज्जतेसाठी राज्य प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

स्पर्धा यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या गोव्यातील काही सुविधा अपूर्ण आहेत, त्यांच्या पूर्णतेवर भर देण्यात आला आहे. सध्या देशव्यापी लॉकडाऊन आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य खरेदी प्रक्रिया हाताळण्याचा आणि लांबणीवर न टाकण्याचा राज्य प्रशासनाचा भर आहे. त्यासंबंधी हल्लीच परिपत्रक काढण्यात आले आहे.

कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) भूमिकेकडे गोवा सरकारचे लक्ष आहे. आयओएने अंतिम निर्णय घ्यावा असे राज्य सरकारला वाटते. लॉकडाऊनमुळे स्पर्धा तयारी कामावर मर्यादा आल्या आहेत. सुविधा अपूर्ण राहिल्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर पडून गोव्याची नाचक्की होऊ नये यावर राज्य प्रशासनाचा भर आहे. २०१६ पासून ही स्पर्धा विविध कारणास्तव लांबली आहे.

एप्रिल महिन्याच्या प्रारंभी, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघास (एनएसएफ) पत्र पाठवून गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. टोकियो ऑलिंपिकपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा देशातील क्रीडापटूंना तयारीसाठी परिपूर्ण व्यासपीठ असेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे टोकियोस जाणाऱ्या खेळाडूंना घरच्या मैदानावर दर्जेदार स्पर्धा मिळेल. ठरल्यानुसार राष्ट्रीय स्पर्धा होण्याचा विश्वास बत्रा यांनी व्यक्त केला होता.  कोविड-१९ महामारीमुळे यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये नियोजित असलेली टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर पडली आहे.

संबंधित बातम्या