हल्याळ येथे राज्यस्तरीय सबज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

हल्याळ:हल्याळ येथील क्रीडा वसती निलयच्या कुस्ती क्रीडापटूंनी दावणगेरी जिल्ह्यातील हरिहर येथे नुकतेच पार पडलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर कुस्ती स्पर्धेत ४ सुवर्णपदक, ५ रजत पदकांसह एकूण ९ पदके पटकावली.

हल्याळ:हल्याळ येथील क्रीडा वसती निलयच्या कुस्ती क्रीडापटूंनी दावणगेरी जिल्ह्यातील हरिहर येथे नुकतेच पार पडलेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर कुस्ती स्पर्धेत ४ सुवर्णपदक, ५ रजत पदकांसह एकूण ९ पदके पटकावली.
मुलींच्या विभागात ४६ किलो वजन गटात शालीना सिद्दी प्रथम, ४९ किलो विभागात रक्षिता नारायण सूर्यवंशी प्रथम, ५३ किलो गटात गायत्री रमेश सुतार प्रथम, ४५ किलो विभागात रूपा कोलेकर द्वितीय, ४३ किलो गटात काव्या घटगोलकर द्वितीय, मुले विभाग ४५ किलो विभागात सुरज गंदिटकर प्रथम, ४८ विभागात रोहन दोडमनी द्वितीय ५१ किलो विभागात शैलेश सुतार द्वितीय, ४५ किलो विभागात पांडुरंग धामणेकर द्वितीय, स्थान पटकावले आहेत.
हल्याळ येथील कुस्तीप्रशिक्षक तुकाराम गौडा, शिवाप्पा पाटील आणि बाळकृष्ण दड्डी, यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल सहाय्‍यक निर्देशक क्रीडा विभाग कारवार यांनी अभिनंदन केले आहे.

रोटरी क्लबतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप

संबंधित बातम्या