सोन्याची झळाळी उतरली

PTI
गुरुवार, 12 मार्च 2020

नवी दिल्लीः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोन्याला बसला. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 516 रुपयांनी घसरला.आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव वधारला. मागील सत्रात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती.

सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 661 डॉलरवर गेला. चांदीचा भावही वधारून प्रतिऔंस 17.03 डॉलर होता. चलन बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया आज दिवसभरातील व्यवहारात 36 पैशांनी वधारला होता. याचा फटका देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावाला बसला.

दिल्लीतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 516 रुपयांची घसरण 44 हजार 517 रुपयांवर आला. याचवेळी चांदीच्या भावातही 146 रुपयांची वाढ होऊन 47 हजार 234 रुपयांवर गेला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी दिली.

मुंबईतही भावात घसरण

मुंबईतील सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात घसरण झाली तर, चांदीचा भाव स्थिर राहिला. शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 366 रुपयांची घसरण होऊन 43 हजार 648 रुपयांवर आला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 46 हजार 5 रुपयांवर स्थिर राहिला.
 
संबंधित बातम्या