‘गोमेकॉ’ सोसायटीच्‍या ४५ भागधारकांचा सत्‍कार

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

जीएमसी साेसायटीत निवृत्तांचा सत्कार सोहळा 

सुरवातीस सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र सिनारी यांनी गोव्याचे सहकारमंत्री गोविंद गावडे यांचे स्वागत करून जमलेले भागधारक, स्टाफ व निवृत्त भागधारक यांचे स्वागत करून सत्कार सोहळ्यास सुरवात झाली.

बांबोळी : गोवा मेडिकल कॉलेज एम्‍प्‍लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीत ४५ निवृत्त भागधारकांचा व १० भागधारकांच्या मुलांना स्कॉलरशिपसहीत गौरविण्यात आले. सोसायटीच्या वार्षिक दिनानिमित्त जे भागधारक निवृत्त झाले, त्यांना प्रत्येकी पाच हजार, शाल व स्मृतिचिन्ह देऊन सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच भागधारकांच्या मुलांना पाच हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यात सर्जरीचे प्रोफेसर, प्रमुख डॉ. दिलीप आमोणकर, फोरेन्‍सिकचे प्रोफेसर डॉ. रॉड्रिग्‍स, डॉ. नागवेकर, मॅट्रन, असिस्टंट मेट्रनस, वार्ड सिस्टरर्स, नर्सेस, युडीसी व इतर ग्रुप डी स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सहकार मंत्र्यांनी आपल्या भाषणांत सोसायटीच्या कार्याबद्दल गौरवोद्‍गार काढले. कुंतल केरकर यांनी सोसायटीच्यावतीने आभार मानले. राजेश भोसले यांनी प्रस्ताविक केले.

पर्यावरणाच्या रक्षणाद्वारे देशसेवा करूया

चेअरमन सुरेंद्र सिनारी यांच्या अधिपत्‍याखाली नव्या कमिटीने सोसायटीचा कारभार हातात घेतल्याने सोसायटीची दिवसेंदिवस भरभराटीकडे वाटचाल चालली आहे. सोसायटीच्या खात्‍यात साडेचार कोटी विनावापर होते, ते कायम ठेव खात्‍यात ठेवण्‍यात आल्‍याने त्‍यावर अधिक व्याज मिळाले. तसेच पाच लाख ऐवजी दहा लाख कर्ज १० टक्के व्याज दराने दिले. त्यामुळे भागधारकांनी दुसरीकडून जास्त दराने घेतलेले कर्ज फेडण्यात येऊन भागधारकांना फायदा झाला. भागधारकांना २५ टक्के लाभांश वाटण्यात आला. तसेच प्रासंगिक कर्ज व कमी मुदतीच्या कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या