विकासासाठी चांगला संकल्प : अस्नोडकर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

 

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दूरदृष्टी ठेऊन विकासाची चांगली मांडणी करणारा असाच आहे. अनेक महत्त्वाकांक्षी योजना अर्थसंकल्पात आहेत.

श्रमसंस्कृतीला महत्त्व देण्याचा विचार स्तुत्य असाच आहे. शिवाय कौशल्याधारीत प्रशिक्षणामुळे राज्यात कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी विद्यावेतन योजनेचा विस्तार महत्त्वाचा आहे. सर्व घटकांचा विकास करण्याचे ध्येय या अर्थसंकल्पाने पूर्ण होणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर खास भर दिला गेला आहे. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताना अशी शेती किफायतशीर बनवण्यासाठीच्या योजनाही सहाय्यकारक ठरणार आहेत. नीती आयोगाच्या धर्तीवर गोवा इन्सिस्ट्यूट ऑफ फ्यूचर ट्रान्स्फॉर्मेशन ही संस्थाही उपयुक्त ठरणार आहे.

शिक्षण व आरोग्य केंद्र (हब) म्हणून गोवा ओळखला जावा, यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत हीसुध्दा महत्त्वपूर्ण बाब आहे. खाणकाम सुरू करणे, आरोग्य व निसर्ग पर्यटन सुरू करणे, व्यवसाय सुलभता वाढवणे, शैक्षणिक केंद्र म्हणून राज्य विकसित करणे, नवीन पूल उभारणी, मयडेची केळी, ताळगाव आणि आगशीची वांगी यांना भौगोलिक ओळख प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीचे खास प्रयत्न हा चांगला प्रयत्न आहे. शेतात काम करणाऱ्यांसाठी विमा कवच व मानधन देण्यासाठीची ‘श्रमसन्मान’ योजना ही एक चांगली संकल्पना आहे.
- उल्हास अस्नोडकर, माजी उपसभापती

 

 

 

संबंधित बातम्या